
no images were found
“बेळगावसाठी नवस करायला मुख्यमंत्री गुवाहाटीला का जात नाहीत?” उद्धव ठाकरे
नवी मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काही दिवसपूर्वी केलेल्या गुवाहाटी दौऱ्यावरून हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री गुवाहाटी दौऱ्यावरून आले आहेत. तर आता त्यांनी बेळगाव महाराष्ट्रात येण्याचा नवस करण्यासाठी पुन्हा गुवाहाटीला जावं, अशा प्रकारचा खोचक टोलाही ठाकरे यांनी लगावला आहे.
सध्या कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. अशातच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. याच सीमावादाचा मुद्दा पकडून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्रावर कुरघोडी करण्यात येत आहे. त्यासंबधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्र सुद्धा काढला नाही असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान आज संत सेवालाल महाराज यांचे पाचवे वंशज अनिल राठोड यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी कर्नाटकाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
ठाकरे पुढे म्हणाले की, कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमक झालेत. तर आमचे मुख्यमंत्री गुवाहाटीहून नवस करून आले आहेत. गुवाहाटीवरून आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला बेळगाव मिळवण्यासाठी नवस करायला का जात नाही? सर्व मंत्री, आमदारांना घेऊन जा, तर बेळगाव महाराष्ट्रात आलंच पाहिजे असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.