
no images were found
उद्योग–शैक्षणिक संस्था यांच्यातील परिसंवाद काळाची गरज : प्र. कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या एम.बी. ए विभागाच्यावतीने आयोजित “एकदिवशीय उद्योग-शैक्षणिकसंस्था संवाद कार्यशाळेच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस.पाटील,आपल्या अध्यक्षीय भाषणातअसे म्हणाले की, आजच्या स्पर्धेच्या युगात उद्योग संस्था यांच्यात परस्पर संवाद,उद्योगाशी मजबूत संबंध विकसित करण्यास मदत होते, हेविद्यार्थ्यांनीओळखून कष्टाची सीडी प्रचंड मोठी आहे ती कोणीच कोणीच रोखू शकत नाही यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्येक गोष्टीतून स्वतःला नवनवीन कौशल्यांच्या जोरावर अद्यावत करणे गरजेचे आहे.जिद्द, चिकाटी, साहस, प्रचंड मेहनत व विविध कौशल्य आत्मसात करून जीवनात यशस्वी होता येते तसेच उद्योग-शैक्षणिकसंस्थायांच्यातील परिसंवाद काळाची गरज, असे प्रतिपादन केले.
पहिल्या सत्रात सी. ए. नितीन हारुगडे, कोल्हापूर यांनी विद्यार्थ्यांना स्वप्ने मोठी पाहून स्वत:ला अद्ययावत करणे गरजेचे आहे . आज प्रत्येक व्यवसायात चांगली संधी आहे. ती शोधून योग्य वेळी पाऊल उचलणे ही काळाची गरज आहे. सूक्ष्म मध्यम व लघु उद्योगांबाबत, भांडवल उभारणी , प्रकल्प अहवाल , प्रक्रिया उद्योग इत्यादीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
दुसऱ्या सत्रात श्री संग्राम पाटीलप्रसिद्ध उद्योजक, मारव्हलस,उद्योग समूह कोल्हापूर यांनी आपल्या भाषणात भारताला महासत्ता बनवण्याचा मार्ग डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी दिला. विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी प्रचंड कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे तसेच यशस्वी होण्यासाठी भूक निर्माण झाली पाहिजे लोकांच्या बरोबर काम करण्याची क्षमता असायला हवी तसेच उद्योगांबरोबर समाजाची सा माजीक जबाबदारी घेणे हे सुद्धा तितकेच आवश्यक असल्याचे मत श्री पाटील यांनी व्यक्त केले.