no images were found
बजाज फायनान्स लिमिटेडतर्फे राष्ट्रव्यापी सखोल जागरूकता कार्यक्रम
पुणे: बजाज फायनान्स लिमिटेड या भारतातील सर्वांत मोठ्या व अत्यंत विविधीकृत एनबीएफसीने तसेच बजाज फिनसर्व्ह लिमिटेडच्या कर्जवितरण विभागाने गोव्यातील आयएफबी कारखान्यात २५०हून अधिक कामगार व कर्मचारीवर्गासाठी एका सार्वजनिक जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन केले. ऑनलाइन फसवणूकींविषयी जागरूकता वाढवण्यासाठी, आर्थिक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी, बँका व एनबीएफसींच्या अंतर्गत तक्रार निवारण यंत्रणेबाबत तसेच आरबीआयच्या एकात्मिक ओंबुड्समन योजनेबाबत माहिती देण्यासाठी, आरबीआयने जाहीर केलेल्या राष्ट्रव्यापी सखोल जागरूकता अभियानाचा भाग म्हणून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. बजाज फायनान्सच्या जोखीम प्रतिबंध व कामकाज विभागांनी घेतलेल्या या सत्रामध्ये फसवणूक करणाऱ्यांद्वारे वापरल्या जाणाऱ्या विविध गुन्हेपद्धती, अशा असुरक्षिततांना प्रतिबंध करण्याच्या सूचना तसेच फसवणूकीचा प्रकार झाल्यास करण्याची कार्यवाही याबद्दल माहिती देण्यात आली.
या प्रत्यक्ष कार्यक्रमाशिवाय बजाज फायनान्सने ऑनलाइन फसवणूकींपासून सुरक्षित राहण्यात तसेच निकोप आर्थिक सवयी लावून घेण्यात मदत करण्यासाठी पुढील सूचनाही सर्वांना देण्यात आल्या.
ऑनलाइन फसवणूकींवर मात करण्यासाठी सुरक्षिततेच्या सूचना:
हे करा :– · सेवेशी निगडित कोणत्याही बाबीसाठी/शंकेसाठी बजाज फायनान्सच्या ग्राहकांनी थेट कंपनीच्या www.bajajfinserv.in/reach-us या वेबसाइटला भेट द्यावी. * अधिक भक्कम पासवर्ड वापरावा आणि ऑनलाइन बँकिंगच्या ओळखीच्या खुणा (क्रिडेन्शिअल्स), एटीएम-पिन, यूपीआय-पिन, वॉलेट पासवर्ड नियमितपणे बदल राहावे. * केवळ विश्वासार्ह कंपनीचेच अँटिव्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावे आणि उपकरणावरील सॉफ्टवेअर अद्ययावत करत राहावे. * कर्जाची परतफेड करण्यासाठी केवळ अधिकृत पेमेंट मोड्सचाच वापर करावा आणि पेमेंटची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मान्यता देणारी पावती घेण्यास कधीच विसरू नये. * अॅलर्टस् व अधिसूचना (नोटिफिकेशन्स) नियमितपणे प्राप्त करण्यासाठी आपले वित्तीय संस्थेकडे किंवा अन्य कोणत्याही सेवा पुरवठादाराकडे नोंदवलेले संपर्क तपशील कायम अद्ययावत राखावे.
हे करू नका : * बजाज फायनान्स कस्टमर केअर क्रमांकासाठी इंटरनेटवरून कधीही सरसकट शोध (जनरिक सर्चेस) घेऊ नका, कारण यातून बनावट हेल्पलाइन क्रमांक व वेबसाइट्सचा शिरकाव होऊ शकतो. * गोपनीय क्रेडिट/डेबिट कार्ड क्रमांक, मुदत संपण्याच्या तारखा, सीव्हीव्ही क्रमांक, एटीएम-पिन, नेट बँकिंग/फोन बँकिंग पासवर्ड, यूपीआय-पिन किंवा ओटीपी कोणालाही सांगू नका. * केवायसी पडताळणीत पॅन/आधार क्रमांक अद्ययावत करण्यासाठी किंवा ईएमआय कार्ड अनब्लॉक करून घेण्यासाठी एखाद्या लिंकवर क्लिक करण्यास सांगणाऱ्या एसएमएसकडे कधीही लक्ष देऊ नका. * अवाजवी कमी दरांत देऊ केले जाणारे कर्ज किंवा आगाऊ पैशासाठी वा प्रक्रिया शुल्कासाठी दिल्या जाणाऱ्या आकर्षक प्रस्तावांना कधीही बळी पडू नका. * टीमव्ह्यूअर/एनी डेस्क यांसारखी उपकरणाच्या सुरक्षिततेशी तडजोड करणारे अपरिचित थर्ड पार्टी अॅप्स डाउनलोड करू नका. * कोणताही अपरिचित क्यूआर कोड स्कॅन करू नका किंवा पैसे प्राप्त करण्यासाठी यूपीआय-पिन एण्टर करू नका. *अपफ्रण्ट शुल्क भरून कर्ज निकाली काढणाऱ्या अवास्तव सेवा देऊ करणाऱ्या कोणत्याही अनधिकृत, खासगी थर्ड पार्टींवर कधीही विश्वास टाकू नका.