Home शासकीय प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत 11 बचतगटांना व्यवसायासाठी 22 लाख बीज भांडवलचे वाटप

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत 11 बचतगटांना व्यवसायासाठी 22 लाख बीज भांडवलचे वाटप

12 second read
0
0
30

no images were found

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत 11 बचतगटांना व्यवसायासाठी 22 लाख बीज भांडवलचे वाटप

कोल्हापूर : दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत स्थापित बचत गटांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी बीज भांडवल देण्याची तरतूद आहे. या योजनेची अंमलबजावणी महानगरपालिकेमार्फत करण्यात येत असून शहरातील 11 बचत गटांना याचा लाभ मिळाले आहे. या सर्व बचत गटांना रु.22,10,000/- कर्जरुपी बीज भांडवल उपलब्ध करुन दिले आहे. यासाठी स्थापित बचत गटांमध्ये दोन किवा त्यापेक्षा अधिक महिला किंवा संपूर्ण बचत गट एकच खाद्य पदार्थाशी निगडीत व्यवसाय करत असेल तर प्रती सदस्य 40,000/- प्रमाणे बीज भांडवल शासनामार्फत वार्षिक 6% व्याजदराने उपलब्ध होत आहे. या अनुदानाच्या चेकचे वितरण शुक्रवारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी उपायुक्त शिल्पा दरेकर, व्यवस्थापक विजय तळेकर, रोहित सोनुले, निवास कोळी, समुदाय संघटक स्वाती शहा, अंजनी सौंदलगेकर आणि बचत गटातील महिला उपस्थित होत्या.

 महानगरपालिकेला सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये 22 बचत गटांचे बीज भांडवल प्रस्ताव ऑनलाईन पोर्टलद्वारे शासनास सादर करण्याचे उद्धिष्ट होते. यासाठी महापालिकेने 31 बचत गटांचे प्रस्ताव शासनाला ऑनलाईन मंजुरीसाठी पाठविले होते. त्यातील 11 बचत गटांचे प्रस्ताव मंजूर झाले असून या बचत गटांना खाद्य उद्योग व्यवसायासाठी बीज भांडवल म्हणून रक्कम रु.22,10,000/- इतकी रक्कम शहरस्तर संघ या खात्यावर जमा झाली आहे. यामध्ये स्वानंदी स्वयंसहायता महिला बचत गटाला सर्व प्रकारचे पापड उद्योगासाठी रु.2,00,000/-, श्री रामसमर्थ स्वयंसहायता महिला बचत गटाला लाडू तयार करणे व विक्रीसाठी रु. 2,00,000/-, कलावती स्वयंसहायता महिला बचत गटाला फरसाण व पापड उद्योगासाठी रु.1,60,000/-, दिव्यशक्ती स्वयंसहायता महिला बचत गटासाठी भडंग व पापड तयार करणे उद्योगासाठी रु.2,00,000/-, शीतल स्वयंसहायता महिला बचत गटास फरसाण, शेव, पापडी उद्योगासाठी रु.1,60,000/-, रमामाता स्वयंसहायता महिला बचत गटास पापड, कुरडई, मछी व्यवसाय उद्योगासाठी रु.2,00,000/-, अहिल्यामाता स्वयंसहायता महिला बचत गटास पापड, कुरडई उद्योगासाठी रु.1,60,000/-, हिरकणी माता स्वयंसहायता महिला बचत गटास तिखट सांडगे तयार करणे उद्योगासाठी रु.80,000/-, वीरमाता स्वयंसहायता महिला बचत गटास चकली व पापड उद्योगासाठी रु.2,50,000/-, जान्हवी स्वयंसहायता महिला बचत गटास लाडू तयार करणे व विक्री उद्योगासाठी रु. 4,00,000/- व साईदत्त स्वयंसहायता महिला बचत गटास शेवया तयार व विक्री उद्योगासाठी रु. 2,00,000/- बीज भांडवल देण्यात आले आहे.  यासाठी उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक विजय तळेकर, रोहित सोनुले, निवास कोळी, समुदाय संघटक स्वाती शहा, अंजनी सौंदलगेकर यांनी विशष परिश्रम घेतले आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…