no images were found
चैत्यभूमीवर उसळला भीमसागर, महापरिनिर्वाण दिनानिमित्य लाखो अनुयायींकडून बाबासाहेबांना वंदन
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि .७ डिसेंबर १९५६ रोजी मुंबईतील चैत्यभूमीवर त्यांच्यावर बौद्ध पद्धतीनं अंत्यसंस्कार करण्यात आले. लाखो अनुयायींकडून बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. चैत्यभूमीवर भीमसागर उसळला आहे.
बाबासाहेबांनी निधनापूर्वी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता. महापारिनिर्वाण दिनानिमत्त १ डिसेंबरपासूनच चैत्यभूमीवर दर्शनासाठी येतात. चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थीकलश आणि प्रतिमेस हे अनुयायी अभिवादन करतात. यावर्षीही संपूर्ण जगभरातून बाबासाहेबांचे अनुयायी चैत्यभूमीवर अभिवादनासाठी आले आहेत. त्यांच्या आगमनाच्या निमित्तानं मुंबई महापालिका आणि प्रशासनानं जय्यत तयारी केलीय. चैत्यभूमीवर असलेल्या स्मृतीस्थळाचे फुलांनी सुशोभीकरण करण्यात आले आहे . तसेच राजकारणी, उच्च पदावरील मान्यवर, संविधानिक पदावरील मान्यवर याठिकाणी येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीना अभिवादन केले .
हे स्मृतीस्थळ एका एक लहान घुमटाच्या स्वरूपात आहे. हे दालन जमिनीवर आणि तळमजल्यात विभागले आहे. चौरस आकाराच्या संरचनेत एक दीड मीटर उंचीची वर्तुळाकार भिंत आहे. वर्तुळामध्ये संगमरवरी फरशीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा आणि गौतम बुद्धाची मूर्ती आहे. वर्तुळाकार भिंतीत दोन दरवाजे आहेत. तळमजल्यावर एक स्तूप आहे आणि तेथे भिक्खूंसाठी विश्रांतीची जागा आहे. चैत्यभूमीचे मुख्य प्रवेशद्वार ही सांचीच्या स्तूपाच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती असून आतमध्ये अशोक स्तंभाची प्रतिकृती बनविली आहे. चैत्यभूमीचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सून मीरा आंबेडकर यांनी ५ डिसेंबर १९७१ रोजी केले होते. समतेचा पुतळा म्हणून या पुतळ्याला संबोधलं जातं.