Home शासकीय धान विक्रीकरिता ऑनलाईन शेतकरी नोंदणीस मुदतवाढ

धान विक्रीकरिता ऑनलाईन शेतकरी नोंदणीस मुदतवाढ

1 second read
0
0
216

no images were found

धान विक्रीकरिता ऑनलाईन शेतकरी नोंदणीस मुदतवाढ

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य मार्केटींग फेडरेशन ही संस्था राज्य शासनाची मुख्य अभिकर्ता संस्था म्हणून खरेदीचे काम पाहते. हंगाम 2022-23 करीता शासनाने एफ.ए.क्यू. प्रतीच्या धान (भात) करीता 2 हजार 40 व रागी (नाचणी) करीता 3 हजार 578 प्रती क्विंटल दर जाहीर केला आहे. हमीभाव खरेदी केंद्रावर धान (भात) व रागी (नाचणी) विक्रीकरिता शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी 7 डिसेंबरअखेर मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा मार्केटींग अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी दिली.

ज्या शेतकऱ्यांना धान/नाचणी खरेदी केंद्रावर धान/नाचणी विक्री करायची आहे अशा शेतकऱ्यांनी चालू हंगाम 2022-23 मधील धान (भात) व नाचणी पिक लागवडीची ऑनलाईन नोंद असलेला सातबारा उतारा, आधारकार्ड व बँक पासबुक झेरॉक्सची आवश्यकता आहे.

आजपर्यंत काही कारणास्तव जे शेतकरी हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणी करु शकले नाही, त्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा व नोंद करावी, असे आवाहन ही श्री. खाडे यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…