Home Uncategorized साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन ऊस दराबाबत तोडगा काढणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन ऊस दराबाबत तोडगा काढणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

12 second read
0
0
4

no images were found

साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन ऊस दराबाबत तोडगा काढणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

 कोल्हापूर, : शेतकऱ्यांची ऊस दराबाबत असणारी मागणी आणि साखर कारखानदार यांच्याकडून केंद्र सरकार मार्फत निश्चित केलेला रास्त व किफायतशीर दर यामध्ये योग्य तो समन्वय साधण्यासाठी शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि साखर कारखानदार यांच्यासोबत संयुक्त बैठक घेऊन प्रती टन ऊसाला योग्य दर देण्याबाबत लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

      गाळप हंगाम 2026 – 27 च्या गळीत हंगामामध्ये येणाऱ्या अडचणी व उपाययोजनांबाबत पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीत गाळप हंगाम 2026 – 27 सुरु करणे व ऊस दर देणे, भरारी पथकाकडून ऊस वजनकाटा तपासणी करणे, ऊस वाहतूक संघटनांची निवेदने व आयत्या वेळच्या विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

      बैठकीला आमदार सर्वश्री राजेंद्र पाटील – यड्रावकर, चंद्रदीप नरके, राहुल आवाडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी, माजी खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, पोलीस अधीक्षक डॉ. निलोत्पल, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, कोल्हापूर विभागाच्या प्रादेशिक सह संचालक (साखर) उज्वला पळसकर, सहकार व साखर आयुक्तालयाचे क्षेत्रीय अधिकारी  तसेच जिल्ह्यातील विविध कारखान्यांचे अध्यक्ष, संचालक, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, वजन मापे विभाग व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.बैठकीत उपस्थित मान्यवरांनी गळीत हंगामात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना तसेच ऊस दराबाबत चर्चा केली.

   पालकमंत्री श्री. आबिटकर म्हणाले, ऊस उत्पादकांना गळीत हंगामात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील. उसाच्या दराबाबत प्रत्यक्ष निर्णय घेण्यासाठी साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली जाईल यानंतर लवकरच ऊस दराबाबत सकारात्मक मार्ग काढला जाईल.

      राजू शेट्टी म्हणाले, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित असणारा दर आणि साखर कारखानदारांकडून देण्यात येणाऱ्या दरामध्ये तफावत आहे. या दोहोंमध्ये समन्वय साधण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कारखानदार, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधींसोबत चर्चा करुन योग्य तो तोडगा काढावा, असे आवाहन त्यांनी केले.

    आमदार चंद्रदीप नरके यांनीही साखर कारखानदार व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन ऊस दराबाबत सकारात्मक मार्ग काढण्याचे आवाहन केले.

    बैठकीच्या सुरुवातीला विविध शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गळीत हंगामात येणाऱ्या अडचणी मांडल्या. तसेच   ऊसाला योग्य दर मिळण्याचे आवाहन केले. साखर कारखानदारांना सहकार्य केले जाईल, तथापि साखरेच्या दराचा विचार करुन त्यानुसार ऊसाला योग्य दर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

डिजिटल युगात शिक्षणाच्या नव्या संधी : डॉ.ज्योती जाधव

डिजिटल युगात शिक्षणाच्या नव्या संधी : डॉ.ज्योती जाधव : दूरशिक्षण  व ऑनलाईन शिक्षण कें…