
no images were found
किस्सा पन्हाळा पानपट्टीचा
काही दिवसापूर्वी लक्ष्मीपुरी येथील पन्हाळा पान शॉप चा फोटो सोशीलमीडिया वर व्हायरल झाला होता, किल्ले पन्हाळ गडाचे नाव पानपट्टीला देणे काही शिवभक्तांना रुचले नाही, बऱ्याच लोकांनी याचा फोटो स्टेटस ठेवून निषेध व्यक्त केला शिवसेनेचे हर्षल सुर्वे यांना सुद्धा काहीनी फोटो पाठवला व काही कार्यकर्त्यांनी त्याना विनंती केली की चला आपण तो बोर्ड फाडून येऊया, पण असे न करता सुर्वे यांनी पानपट्टी चे मालक वसीम पन्हाळकर यांची भेट घेतली व त्यांना विनंती केली की पन्हाळगडा विषयी आमच्या मनात आदराची भावना आहे, आपण दिलेले पानपट्टीला नाव हे शिवभक्तांना आवडलेलं नाही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही हे नाव बदलावे पण पानपट्टीचे मालक वसीम यांनी सांगितले की चार दिवसापूर्वी बोर्ड नवीन बसवला आहे आणि कर्ज काढून पानपट्टी सुरू केली आहे आता माझ्याकडे खर्च करण्यात की पैसे नाहीत, पण हर्षल सुर्वे यांनी बोर्डाचा खर्च मी स्वतः करतो पण नाव बदला अशी विनंती केली, आता त्या ठिकाणी
पन्हाळकर वासिम पान भवन या नावाचा नवीन बोर्ड लागला व त्याचे उद्घाटन ही हर्षल सुर्वे व अश्किन आजरेकर व काही ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला, काही प्रश्न असतात जे जातीपाती व भावनेच्या पलीकडे जाऊन सोडवले जातात त्याचे हे जिवंत उदाहरण आहे.