Home क्राईम कोरियन तरुणीचा मुंबईत विनयभंग, दोन तरुणांवर गुन्हा दाखल

कोरियन तरुणीचा मुंबईत विनयभंग, दोन तरुणांवर गुन्हा दाखल

0 second read
0
0
151

no images were found

कोरियन तरुणीचा मुंबईत विनयभंग, दोन तरुणांवर गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईत घडलेल्या एका घटनेने संपूर्ण देशाचंच नाही तर परदेशातील माध्यामांचंही लक्ष वेधून घेतलं आहे. दोन तरुणांनी यूट्यूबवर लाईव्ह स्ट्रीम करणाऱ्या एका कोरियन मुलीचा विनयभंग केल्य़ाची ही घटना आहे. याप्रकरणी मोबिन चांद मोहम्मद शेख आणि मोहम्मद नकीब सद्री आलम अन्सारी अशी या दोघांची नावे असून त्यांच्यावर या कोरियन मुलीचा विनंयभंग केल्याबद्दल खार पोलिसांनी भारतीय दंडविधान संहितेच्या कलम 354 नुसार गुन्हा नोंदवला आहे.
एक कोरियन मुलगी व्हीडिओचं चित्रिकरण करताना हजाराहून अधिक लोक तेथे होते, मात्र त्या त्रास देणाऱ्या तरुणांना तिच्यापासून दूर करण्यासाठी कोणीही मदत केली नाही अशी माहिती सोशल मीडियात व्यक्त होत आहे. ट्वीटरसारख्या समाजमाध्यमात काही लोक संतापही व्यक्त करत आहेत. ट्विच या लाइव्हस्ट्रीमिंग सर्व्हिसवर विनयभंग झालेल्या मुलीचे १२,००० हून अधिक फॉलोअर्स आहेत. त्या व्हीडिओ गेम खेळताना आणि नवनवीन पदार्थांचा आस्वाद घेतानाचे व्हीडिओ पोस्ट करतात. त्या भारतात गेले काही आठवडे वास्तव्यास आहेत आणि लाइव्ह व्लॉग्सच्या माध्यमातून आपला अनुभव सांगत आहेत. मंगळवारी त्या खार परिसरात भटकंती करत होत्या. एकीकडे आपल्या फॉलोअर्सशी संवाद साधतानाच दुसरीकडे त्या रस्त्यावरील लोकांशीही गप्पा मारत होत्या. तेव्हा एक पुरुष त्यांच्याजवळ आला
व्हीडिओत दिसते की त्या पुरुषाने त्यांचा दंड पकडला आहे आणि आपल्या मोटरबाइकवर त्यांना खेचण्याचा प्रयत्न करत आहे. तो त्यांच्या गालाचे चुंबन घेण्याचाही प्रयत्न करत आहे. या प्रकाराने त्या घाबरल्या, त्याच्यापासून दूर झाल्या आणि “आता घरी जायची वेळ आली आहे.”, असे त्या स्ट्रीमिंग करत म्हणाल्या. पण त्या इसमाने व त्याच्या मित्राने बाइकवरून त्यांचा पाठलाग सुरू ठेवला आणि त्यांचा फोन नंबर मागितला. अखेर तिथे दुसरा एक इसम आला आणि त्या दोघांना थांबण्यास सांगितले. या व्हीडिओत त्या धावताना दिसतात. हॉटेलमध्ये गेल्यावर आपण सुरक्षित असल्याचे सांगत त्यांनी व्हीडिओचा शेवट केला. त्यांनी नंतर या प्रसंगाची क्लिप इन्स्टाग्राम स्टोरी म्हणून पोस्ट केली. ‘प्रकरण गंभीर होऊ नये’ म्हणून त्यांनी शक्य ते सर्व प्रयत्न केले, अशी कॅप्शन दिली आहे.त्या असेही म्हणाल्या की, प्रतिक्रिया देणाऱ्या काहींनी त्यांनाच या छळवणूकीसाठी कारणीभूत धरले. कारण त्या खूपच मैत्रीपूर्ण वर्तन करत होत्या आणि तो इसम त्यांच्या जवळ आला तेव्हा त्यांनी (तरुणीने) संभाषण सुरू केले. पण इतरांनी या तरुणीची बाजू घेतली आणि पोलिसांत तक्रार दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर पोलिसांनी युझरशी व संबंधित मुलीशी यांच्याशी ट्विटरवर संपर्क साधला आणि या प्रसंगाबद्दल अधिक तपशील मागितला. त्यानंतर पुरुषांच्या पेहेरावाचे वर्णन ट्विट केले व पुढील कारवाई झाली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…