येत्या काही दिवसांत पावसाचा परतीचा प्रवास मुंबईः महाराष्ट्रात आता आठवडाभर पावसाचा जोर कमीच राहणार आहे. देशातून नैऋत्य मौसमी वाऱ्यांनी माघार घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं येत्या काही दिवसांत पावसाचा परतीचा प्रवास सुरू होण्याची दाट शक्यता आहे. याच काळात मोठ्या पावसासाठी आवश्यक कमी दाबाची क्षेत्रे तयार होण्याची शक्यताही कमी असल्याचे हवामान शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू …