no images were found
निलंगा तालुक्यातील गावांना भूकंपाचे धक्के, भीतीने लोक रस्त्यावर
निलंगा : आज पहाटे भूगर्भात झालेल्या आवाजाची २.० रिश्टर स्केल भुकंपांची नोंद झाली असल्याची माहीती मिळाली आहे. ही नोंद दिल्ली येथील राष्ट्रीय भूकंप विभागाच्या साइटवरती झाली आहे. २९ वर्षांपूर्वी लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावात भूंकपा झाला होता. निलंगा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के जावणल्याने किल्लारीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. त्यामुळे भीतीने लोक रस्त्यावर आले. किल्लारी येथे ३० सप्टेंबर १९९३ रोजी ६.२ रिश्टरस्केल भूकंप झाला होता.
हासोरी गावासह अन्य सहा गावांमध्ये मागील पंधरा दिवसापासून मोठा आवाज होत होता. १२ सप्टेंबर रोजीही रात्री सव्वा दहा वाजता जमीन हादरली होती ( भूगर्भात हालचाल) भूकंपाच्या भीतीने परिसरातील लोक भयभीत झाले होते. यावरून नागरिकांनीही प्रशासनाच्या विरोधात थेट राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे कैफियत मांडली होती. भूकंप असल्याच्या भीतीने लोक रस्त्यावर रात्र जागून काढली. दुसरीकडे प्रशासन मात्र भूकंप नसल्याचा दावा करून हात झटकून मोकळे होत होते. निलंगा तालुक्यातील हासोरी-बु. यासह परिसरातील सहा गावात मागील काही दिवसापासून येत असलेले आवाज हे भुगर्भातील आवाज नव्हे तर भुकंप असल्याचे सिध्द झाले आहे.
तालुक्यातील हासोरी गावासह परिसरातील गावात ५ आणि ७ सप्टेंबरला भूकंपा सारखा धक्का जाणवल्याची माहिती गावकऱ्यांनी लोकप्रतिनीधी आणि प्रशासनाला दिली होती. त्यानंतर लातूर येथील भूगर्भ शास्त्रज्ञांनी ७ सप्टेंबर रोजी भेट देऊन लोकांशी चर्चा केली. तसेच हा भूकंप नसून तशी कोणतीही नोंद भुकंप केंद्रात झालेली नाही, त्यामुळे लोकांनी भिऊ नये असे अवाहन केले होते.