no images were found
1000 चौ.मी. इमारत बांधकाम परवानगीसाठी शिबीर
कोल्हापूर : महापालिका क्षेत्रातील नगररचना विभागाकडे दाखल झालेल्या विकास परवानगी प्रकरणांचे मंजूरीकामी गुरुवार, दि.07 मार्च 2024 रोजी नगररचना विभागामार्फत एक दिवसाच्या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये 1000 चौ.मी. भूखंड क्षेत्रापर्यंतची विकास प्रकरणे घेतली जाणार आहे. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या सुचनेनुसार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत हे शिबीर घेतले जाणार आहे. तरी संबंधीतांनी सदरच्या शिबीरामध्ये सहभागी होणेकरीता दि.07 मार्च 2024 रोजी राजारामपुरी बागल मार्केट येथे नगररचना विभागात आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करून संबधीतांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा असे आवाहन नगररचना विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.