no images were found
शिवतीर्थावर दसरा मेळाव्यात ठाकरे यांचाच आवाज, उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ठाकरे गटात जल्लोष
मुंबई – उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाचा अर्ज फेटाळताना मुंबई महानगरपालिकेने आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचंही महत्त्वाचं निरीक्षण न्यायालयाने मांडलं. या निर्णयामुळे ठाकरे गटात जल्लोष साजरा करण्यात येत आहे.
शिवतिर्थावर दसरा मेळावा घेण्याबाबत सुरु असलेल्या वादासंदर्भात आज कोर्टात सुनावणी संपली. दरम्यान शिवाजी पार्कसाठी शिंदे गटानेही हायकोर्टाचे दार ठोठावले होते मात्र तिन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर शिंदे गटाती याचिका उच्च न्यायलयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर शिंदे गटाला दसरा मेळावा घेता येणार नाहीये. शिंदे गटातर्फे शिवाजी पार्कसाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. आपला शिंदे गट हीच आपली शिवसेना आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांकडे अशा प्रकारची परवानगी मागण्याचा कोणता अधिकार नाही. दरवर्षी शिवसेनेकडून सदा सरवणकर दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कची परवानगी मागत असतात. त्यामुळे त्यांचा अर्ज हा याचिकाकर्त्यांच्या आधी महानगरपालिकेकडे गेला आहे.
शिवसेनेकडून अनिल देसाई यांनी अर्ज दाखल केला आहे. मात्र, देसाई यांच्याकडे शिवसेनेचे कोणतेही पद नाही. त्यामुळे त्यांच्याकडे शिवसेनेसाठी परवानगी मागण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे आपला शिंदे गट आहे हीच खरी शिवसेना. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी परवानगी शिंदे गटाला दिली पाहिजे असे शिंदे गटाच्या याचिकेत म्हटले आहे.
शिंदे गट आणि शिवसेना या दोन्ही परस्पर विरोधी अर्जदारांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज पार्क मैदानात दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगीसाठी अर्ज केले असताना कोणत्याही एका अर्जदारास दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी दिल्यास त्यामधून शिवाजीपार्कच्या संवेदनशील परीसरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होवू शकतो. असे म्हणत मुंबई महापालिकेने दोन्ही गटाला परवानगी नाकारली होती. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले होते