no images were found
दसरा-दिवाळीला अंबाबाई मंदिर परिसरात वाहतूक सुरू, व्यापाऱ्यांच्या मागणीला यश
कोल्हापूर : दसरा-दिवाळीला अंबाबाई मंदिर परिसरातील वाहतूक सुरू ठेवण्याचा निर्णय आज व्यापाऱ्यांच्या प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
सणांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने अंबाबाई मंदिर रोड परिसरात बॅरिकेटिंग लावून सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद केले जातात. परिणामी येथे असणाऱ्या सर्वच व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होत होता. परिणामी यावर मार्ग काढण्यासाठी प्रशासन, कोल्हापूर सराफ व्यापारी संघ व महाद्वार रोड व्यापारी असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून बैठकांचे आयोजन केले होते. दरम्यान, आज सराफ व्यापारी संघाच्या कार्यालयात जिल्हा पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे, करवीर तहसीलदार शीतल भांबरे-मुळे, शहर पोलिस उपाधीक्षक मंगेश चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, वाहतूकच्या स्नेहा गिरी, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता नारायण भोसले, अतिक्रमण विभागप्रमुख सचिन जाधव यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
अतिक्रमणविरोधी मोहीम दिवसभरात दोनवेळा चालेल. परिसरातील सर्व रस्ते डांबरीकरण करण्यात येणार. महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारणार. मालाची चढ-उतार रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत. व्यापाऱ्यांच्या दारातील बॅरिकेटिंग सणाच्या कालावधीत हटवणार.