
no images were found
माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमारच्या गाडीला अपघात
काही महिन्यांपूर्वीच भारतीय संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत याच्या गाडीचा उत्तराखंड येथे अपघात झाला. या अपघातात जखमी झालेला ऋषभ पंत बालंबाल बचावला होता. प्रवीण कुमारच्या अपघातामुळे ऋषभ पंतच्या गाडीच्या अपघाताच्या आठवणी जाग्या झाल्या.
भारतीय संघाचा माजी जलदगती गोलंदाज प्रवीण कुमार याच्या गाडीला रात्री उत्तर प्रदेशातील मीरत येथे अपघात झाला. यावेळी प्रवीण कुमार आपल्या मुलासह गाडीतून प्रवास करत होता, सुदैवाने प्रवीण आणि त्याचा मुलगा या अपघातातून सुखरुप बचावला आहे.
“खरंतर हा अपघात अतिशय गंभीर असू शकला असता. परंतु देवाच्या कृपेमुळे मी आणि माझा मुलगा सुखरुप आहोत. मी माझ्या पुतण्याला सोडायला जात असताना एक मोठा ट्रक गाडीला पाठीमागून येऊन धडकला. परंतु माझी गाडी मोठी असल्यामुळे फारशी इजा झाली नाही”, असं प्रवीण म्हणाला.