
no images were found
अनयाज चेस क्लबच्या वतीने शालेय मुलांसाठी शास्त्रीय बुद्धिबळ स्पर्धा शनिवारपासून कोल्हापुरात
कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने अनयाज चेस क्लब कोल्हापूर च्या वतीने शालेय मुलांसाठी विविध वयोगटात शनिवार दि. 8 व रविवार दि. 9 जुलै रोजी शास्त्रीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली आहे. ‘चंदवाणी हॉल’ बीएसएनएल मुख्यालयाजवळ, ताराबाई पार्क येथे होणाऱ्या या स्पर्धा नऊ, बारा व पंधरा वर्षाखालील मुलांसाठी स्विस लीग पद्धतीने शास्त्रीय बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकूण सहा फेऱ्यात होणार आहेत.बुद्धिबळात प्रगती होण्यासाठी व मूलभूत खेळ सुधारण्यासाठी शास्त्रीय प्रकाराने बुद्धिबळ खेळणे आवश्यक आहे. नवोदित व उदयण्मुख बुद्धिबळपटूना चांगला अनुभव व सराव मिळून आंतरराष्ट्रीय गुणांकन मिळवणे व वाढवणेसाठी अश्या स्पर्धा उपयुक्त आहेत.
या स्पर्धेसाठी प्रत्येक खेळाडूस तीस मिनिटे व प्रत्येक खेळीस प्रत्येकी 30 सेकंदाचा वाढीव वेळ दिला जाणार आहे.प्रत्येक खेळाडूने शेवटपर्यंत डाव लिहिणे बंधनकारक आहे. नऊ,बारा व पंधरा वर्षाखालील प्रत्येक गटासाठी एकूण रुपये 5200 ची रोख बक्षीसे व चषक आणि मेडल स्वरूपात एकूण सोळा बक्षीसे ठेवली आहेत.प्रत्येक गटातील, पहिल्या सात क्रमांकाना अनुक्रमे रोख रुपये 1200/- , 1000/-, 800/-, 700/-, 600/-,500/-, व 400/- व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.याशिवाय प्रत्येक गटातील आठव्या,नवव्या व दहाव्या क्रमांकासाठी व उत्कृष्ट तीन मुली व तीन बिगर गुणांकन प्राप्त बुद्धिबळपटू ना मेडल्स देऊन सन्मानित केले जाणार आहेत.आहेत.या व्यतिरिक्त तीन उत्कृष्ट शाळांना आकर्षक चषक देण्यात येणार आहे.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रत्येक खेळाडूस तीनशे रुपये प्रवेश शुल्क आकारले आहे.प्रथम येणाऱ्या शंभर बुद्धिबळपटूंनाच प्रवेश दिला जाणार आहे.तरी इच्छुक बुद्धिबळपटू प्रवेश फी सह आपली नावे सात जुलै ला रात्री आठ पर्यंत खालील व्यक्तींकडे नोंदवावीत. ऐनवेळी स्पर्धा स्थळी प्रवेश दिला जाणार नाही.
1) मनिष मारुलकर :- 9922965173
2) आरती मोदी :- 8149740405
3) रोहित पोळ :- 9657333926
या स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी सकाळी दहा वाजता भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष राहुल चिकोडे व युवा उद्योजक मनीष झंवर यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनानंतर स्पर्धेच्या पहिल्या फेरीस प्रारंभ होईल.
असे मुख्य स्पर्धा संयोजक व अनयाज चेस क्लबचे प्रशिक्षक मनीष मारुलकर व आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले यांनी या पत्रकारद्वारे कळविले आहे.