Home राजकीय बैठकीला कमी आमदार आल्याने अजित पवार अस्वस्थ

बैठकीला कमी आमदार आल्याने अजित पवार अस्वस्थ

0 second read
0
0
33

no images were found

बैठकीला कमी आमदार आल्याने अजित पवार अस्वस्थ

मुंबई : मेळाव्याला कमी आमदार आल्याने अजित पवार अस्वस्थ झाले आहेत. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांचं आज शक्तीप्रदर्शन होत आहे. वांद्रे येथील एमईटी कॉलेजच्या मैदानावर राष्ट्रवादीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

 या मेळाव्याला राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते आले आहेत. अजित पवार हे सुद्धा या मेळाव्यात पोहोचले. पण मेळाव्याला अवघे 29 आमदारच पोहोचल्याने अजित पवार यांच्या गटाची धाकधूक वाढली आहे.अजित पवार यांच्याकडे 40हून अधिक आमदार असल्याचं सांगितलं जात होतं. या आमदारांनी प्रतिज्ञापत्र अजित पवारांकडे प्रतिज्ञापत्र सादर केलं असल्याचंही सांगितलं जात होतं.मात्र, प्रत्यक्षात फक्त 22 आमदारच या बैठकीला हजर झाल्याने अजित पवार यांचा चेहरा पडला होता.

राष्ट्रवादीकडे एकूण 54 आमदार आहेत. त्यातील दोन तृतीयांश आमदारांचा पाठिंबा असेल तरच अजित पवार यांचं बंड यशस्वी होऊ शकतं. तेवढं संख्याबळ नसेल तर त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होतो आणि त्यांचं मंत्रीपद जाऊ शकतं. आजच्या बैठकीत तो अपेक्षित आकडा नसल्याने अजित पवार अस्वस्थ झाले आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एचडीएफसी बँकेचा महाराष्ट्रात भव्य ‘ऑटो लोन मेळा’

एचडीएफसी बँकेचा महाराष्ट्रात भव्य ‘ऑटो लोन मेळा’   कोल्हापूर,(प्रतिनिधी):-भारतातील आघ…