Home शैक्षणिक डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ‘मेकॅनिकल’च्या १२० विद्यार्थ्यांची विविध कंपन्यामध्ये निवड

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ‘मेकॅनिकल’च्या १२० विद्यार्थ्यांची विविध कंपन्यामध्ये निवड

1 second read
0
0
31

no images were found

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ‘मेकॅनिकल’च्या १२० विद्यार्थ्यांची विविध कंपन्यामध्ये निवड

कसबा बावडा : कसबा बावडा येथील डी. वाय .पाटील अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल विभागाच्या १२० विद्यार्थ्यांची विविध राष्ट्रीय आणि आतंरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना ३ लाखापासून ७ लाख पर्यंतचे पॅकेज ऑफर करण्यात आले आहे.

महाविद्यालयाच्या मेकॅनिकल डिपार्टमेंट मध्ये कॅम्पस प्लेसमेंट साठी विविध कंपन्यांनी भेट दिली. यामध्ये अपोलो टायर्स, आर.एल.इ इंटरनॅशनल, एल.अँड टी, प्राज, व्हील्स इंडिया, आर .डी .सी काँक्रीट, रिलाइन्स रिटेल,विप्रो-पारी, घाटगे पाटील इंडस्ट्री, झवर इंडस्ट्री, डी. एक्स टेक्नॉलॉजी,विलो माथर प्लट, महाबळ इंडस्ट्री अशा औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्यांचा समावेश आहे.

यामध्ये मृण्मयी घोरपडे हिला अपोलो टायर्सतर्फे ६ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले. तर उद्धव पाटील आणि मधुमती देसाई यांची आर. एल .इ इंटरनॅशनल या कंपनीत निवड झाली असून त्यांना 4.3 लाखाचे पॅकेज मिळाले. किरण कांबळे (एल .अँड. टी), सोहम कुंभार (आर.डी.सी काँक्रीट), यशश्री जाधव (प्राज) यांना ४ लाखाचे पॅकेज मिळाले. तसेच निखिल पाटील, प्रसाद पाटील, प्रतीक साळोखे, ऋषिकेश जाधव, समृद्धी मुळे, स्वप्नील पवार या सहा विद्यार्थ्यांची विप्रो-पारी मध्ये निवड झाली असून त्यांना ३.८ लाखाची पॅकेज मिळाले तर अभिषेक पाटील आणि सुमित भोसले यांची टी.सि. एस कंपनीमध्ये तर अन्य 18 जणांची डी.एक्स.टेक्नॉलॉजी मध्ये ४.२ लाख रुपये पॅकेज मिळाले आहे.
मुलांना कॅम्पस प्लेसमेंटसाठी डिपार्टमेंटतर्फे अभ्यासक्रमाबरोबरच वैयक्तिक मार्गदर्शन व्यक्तिमत्व विकास आणि प्रशिक्षण त्याशिवाय विविध कार्यशाळा डिपार्टमेंटतर्फे सतत आयोजित केल्या जात होत्या. याशिवाय संभाषण कौशल्य, नेतृत्व गुण यासाठी डिपारमेंटतर्फे विविध कार्यशाळा सुद्धा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आल्या होत्या. यामुळे विद्यार्थ्यांना प्लेसमेंट साठी मोठ्या प्रमाणात मदत झाली.
सदर प्लेसमेंटसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे शिवाय यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. या निवडीसाठी विभाग प्रमुख डॉ. सुनील रायकर, कॅम्पस ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर प्रा. सुदर्शन सुतार, हेड ट्रेनिंग मकरंद काइंगडे, डीपार्टमेंटल ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्रा. विराज पसारे, प्रा.उत्कर्ष पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…