
no images were found
तुर्कीतील कोळसा खाणीतील भीषण स्फोटात २५ जणांचा बळी; १२ पेक्षा जास्त अडकल्याचा अंदाज
तुर्की : तुर्की येथे कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात सुमारे २५ जणांना आपला जीव गमवावा लागला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दुर्घटनेत १२ पेक्षा अधिक लोक खाणीत अडकले असून त्यांच्या बचावासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे शुक्रवारी काला सागर किनाऱ्यावर वसलेल्या बार्टिनच्या अमासरा शहरालगत असलेल्या सरकारी टीटीके अमासरा खाणीत हि दुर्घटना घडली.
तुर्कीचे उर्जामंत्री फातिह डोनमेज व तुर्कीचे आरोग्यमंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुर्कीतील एका कोळसा खाणीत स्फोट झाला असून अंदाजे २५ जणांचा मृत्यू झाला आहे. खाणीत अजूनही अनेकजण फसले असून बचावकार्य सुरु आहे. खाणीत झालेला स्फोट हा फायरएम्पमुळं झाल्याची प्राथमिक माहिती सांगण्यात येत आहे.
खाणीत जेव्हा स्फोट झाला त्यावेळेस ११० लोक तेथे काम करत होते. स्फोटानंतर काही कामगारांना ताबडतोब बाहेर पडणे शक्य झाले. धोकादायक क्षेत्रात ४९ पेक्षा अधिक कामगार अडकून राहिले. खाणीतून ४९ पैकी काही कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले असले तरी अद्याप खाणीत आणखी किती लोक अडकले आहेत याचा आकडा स्पष्ट झालेला नाही. या दुर्घटनेत २५ लोकांचा मृत्यू झाला तर ८ कामगारांची प्रकृती अजून चिंताजनक आहे.
तुर्कीचे राष्ट्रपती तईप एर्गोगन आजचे आपले सगळे कार्यक्रम रद्द करून स्फोटानंतर तातडीने घटनास्थळी पोहोचण्यासाठी रवाना झाले आहेत. यावेळी त्यांनी एक ट्विटदेखील केलं आहे. तुर्कीतील स्थानिक वेळेनुसार ३.१५ च्या सुमारास स्फोट झाला. खाणीच्या प्रवेशद्वारापासून ३०० मीटर खोल हा स्फोट झाला असून ४४ कामगार खाणीच्या प्रवेशद्वारापासून ३०० मीटर खोल अडकले आहेत. तर ५ जण ३५० मीटर खोल खाली अडकले आहेत. खाणीत अजूनही अनेकजण फसले असून बचावकार्य सुरु आहे. खाणीत झालेला स्फोट हा फायरएम्पमुळं झाल्याची प्राथमिक माहिती सांगण्यात येत आहे.