
no images were found
‘हिमाचल प्रदेश’ची विधानसभा निवडणूक जाहीर
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगानं केवळ हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याची घोषणा केली.
आयोगाच्या माहितीनुसार, हिमाचर प्रदेशात ६८ विधानसभा मतदारसंघांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. यासाठी २५ ऑक्टोबर २०२२ हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटा दिवस असेल. २७ ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल, तर २९ ऑक्टोबर हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल. त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक दरवर्षी पेक्षा वेगळी आणि निर्णायक ठरणार आहे. कारण राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांचा परिणाम या येत्या महानगरपालिका निवडणुकांवर दिसणार आहेत. दरम्यान, नोव्हेंबरमध्ये महापालिका निवडणुका होणार असल्याची माहिती शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दिली होती. त्याअनुषंगानं आजच्या निवडणुक आयोगाच्या पत्रकार परिषदेत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची देखील घोषणा होईल असं वाटत होतं. शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गटाने आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे.
या गटात मुंबईतील आमदारांचाही समावेश आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूकांमध्ये शिंदे गट आणि भाजप एकत्र लढून शिवसेनेला एकाकी पाडण्याचा प्रयत्न तर होणारच पण १५० जागांवर दावा केला जात असल्याने शिवसेनेच्या अडचणी वाढवण्याचा भाजपाचा प्रयत्न राहणार आहे.
दोन विधानसभेच्या (हिमाचल प्रदेश आणि गुजरात) कार्यकाळात ४० दिवसांचं अंतर आहे. हिमाचल प्रदेशमध्ये हवामानाची स्थिती महत्त्वाची आहे. विशेषत: या राज्याच्या उत्तर भागात जिथं बर्फवृष्टी होते, म्हणून हिमाचलची निवडणूक आधी जाहीर करण्यात आल्याचं स्पष्टीकरण मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.