Home क्राईम चौदा टोळीतील १०१ गुन्हेगारांवर मोका

चौदा टोळीतील १०१ गुन्हेगारांवर मोका

2 second read
0
0
81

no images were found

चौदा टोळीतील १०१ गुन्हेगारांवर मोका

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या वर्षभरात चौदा टोळीतील १०१ गुन्हेगारांवर मोका कारवाई केली आहे.
संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी राज्य सरकारने तयार केलेल्या या महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
यामुळे संघटित गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कारवाई पुढीलप्रमाणे-चिखली ठाण्याच्या हद्दीतील आकाश उत्तम शिनगारे (रा. मोरेवस्ती, चिखली) व इतर तीनजण, चाकण ठाण्यातील लक्ष्मण बाबूराव धोत्रे (रा. शेल पिंपळगाव) व इतर चारजण, सनी ऊर्फ सोन्या सुरेश शिंदे व इतर तीन जण, देहूरोड हद्दीतील देवा ऊर्फ देवानंद भीमाशंकर जमादार (रा. किवळे) व इतर आठ जण, पिंपरी ठाण्यातील अमित भुरेलाल सौदे (रा. रिव्हर रोड, पिंपरी) व इतर पाच जण, अरुण बिपिन परदेशी (रा. पिंपरी) व इतर तीन जण, जितेंद्र ऊर्फ जित्या आनंदा जाधव (रा.ओटास्कीम, निगडी) , सांगवी हद्दीतील गणेश हनुमंत मोटे (रा. कवडेनगर, सांगवी) व इतर १३ जण, गणेश ऊर्फ केदार नानासाहेब गायकवाड (रा. औंध ) व इतर पाच जण, वाकड हद्दीतील सागर ऊर्फ बबल्या बापू खताळ (रा. कान्हेवाडी) व इतर तीन जण, शिरगाव हद्दीतील निहालसिंग गिरवर गुदेन (रा. मध्यप्रदेश) व इतर दहा जण, निगडी हद्दीतील आदर्श ऊर्फ छोट्या अशोक मगर (रा. राहुलनगर , निगडी) व इतर नऊ जण यांचा समावेश आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…