
no images were found
प्रत्येकांनी गणिताप्रती अभिरुची वाढविणे गरजेचे : डॉ.मांजरेकर
कोल्हापूर (प्रतिनिधी) : गणित हा विषय प्रत्येकाच्या दैनदिन जीवनाशी संबंधित आहे.त्यामुळे सर्वांनी गणिताप्रती अभिरुची वाढविणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या गणित अधिविभागाचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ.सी.एस.मांजरेकर यांनी केले. दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रातील प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या व्यक्तिमत्व विकास व रोजगाराच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविण्यात येतात.त्याचाच एक भाग राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणित विषयांतर्गत ‘संख्यात्मक सिद्धांत ‘ या विषयावर आयोजित ऑनलाइन व्याख्यानात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी अध्यक्षस्थानी संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे उपस्थित होते.
डॉ.मांजरेकर म्हणाले की,संख्यात्मक सिद्धांत वापरून कोडींग थेरी तयार करता येते.त्याचा वापर संरक्षण खात्यामध्ये संदेश पाठविण्यासाठी करतात.या सिद्धांताचा बँक ,एल.आय.सी.यामध्ये ही मोठ्या प्रमाणात होतो.संख्या सिद्धांत हा विषय तत्त्वज्ञान व तर्कशास्त्राशी संबंधित आहे.याचा वापर दैनदिन जीवनात प्रत्येक टप्यावर होत असतो.नैसर्गिक संख्यांचा उगम दैनंदिन जीवनातून झाला आहे.
महान गणिततज्ञ रामानुजन यांनी इनफायनाइट सिरीज ,नंबर थिअरी ,गणिती विश्लेषण याबाबती बाबतीत गणित क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे.त्यांनी गणित क्षेत्रात प्रमेय आणि सूत्र दिली त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.त्याचा फायदा सर्वच क्षेत्रांत होताना दिसत आहे.असे प्रा.मांजरेकर यांनी सांगितले.
प्रा.डॉ.मोरे म्हणाले की, आजच्या या धावत्या जगामध्ये नव नवीन गोष्टी आत्मसात करण्यासाठी तरुण पिढीने गणितातील प्रमेय आणि सूत्रे आत्मसात केली पाहिजेत.
यावेळी स्वागत व प्रास्ताविक समन्वयक डॉ.के.बी.पाटील यांनी केले,पाहुण्यांची ओळख सहा.प्राध्यापक श्री.डी.पी.गावडे यांनी करून दिली,सूत्रसंचालन श्रीमती जी,ए,भोसले यांनी केले. तर आभार सहा.प्राध्यापक डॉ.एन.एस.रणदिवे यांनी मानले.