शिवाजी विद्यापीठात कला-क्रीडाविषयक उपक्रमांनी श्रीमंत शाहू महाराजांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस उत्साहात कोल्हापूर : कोल्हापूरचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस शिवाजी विद्यापीठाने कला, क्रीडाविषयक उपक्रम आयोजित करून मोठ्या उत्साहात साजरा केला. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी शाहू छत्रपती महाराजांना दीर्घायुरारोग्य लाभो, अशा सदिच्छा या प्रसंगी दिल्या. श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या वतीने ‘स्वरार्पण’ …