no images were found
ईपीएफओ व्याजदरात मोठा बदल
मुंबई : नोकरदार वर्गासाठी ज्यांचं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने(ईपीएफओ) मध्ये खातं आहे अशा सर्वांसाठी एक मोठी बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने ने आपल्या व्याजदरात वाढ केली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने ने ही आनंदाची बातमी दिली आहे. ज्यांचं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच खातं आहे त्या सगळ्या ग्राहकांना FY- २२-२३ साठी ८.१५ टक्के व्याजदर मिळणार आहे. याआधी सरकारने २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी ८.१ टक्के व्याजदर ठेवला होता. हा व्याजदर गेल्या चार दशकांतील सर्वात कमी व्याजदर ठरला. २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी हा दर ८.५ टक्के होता. परंतु मार्च २०२२मध्ये तो ८.१ टक्के करण्यात आला. आता २२-२३ या आर्थिक वर्षासाठी ८.१५ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
“कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी ने मंगळवारी झालेल्या बैठकीत २०२२-२३ साठी कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी वर ८.१५ टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.