no images were found
सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा झळाळी
नवी दिल्ली: सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ सुरूच आहे. आज व्यवहाराच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी सकाळी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. ताज्या अपडेटनुसार, ९९९ शुद्धतेच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत ५२ हजार रुपयांच्या पार गेली असून एक किलो चांदीचा भाव ६१ हजारांच्या पुढे पोहोचला आहे.
ibjarates.com नुसार ९९९ शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याची किंमत ५२,५६० रुपये आहे. तर ९९५ शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याचा भाव ५२,३५० रुपयांवर गेला पोहोचला आहे. ९१६ शुद्धतेचे सोने आज ४८१४५ रुपये तर ७५० शुद्धतेच्या सोन्याचा भाव ३९,४२० रुपये इतका झाला आहे. त्याचवेळी ५८५ शुद्धतेचे सोने आज महाग होऊन ३०,७४८ रुपयांत विकले जात आहे. याशिवाय ९९९ शुद्धतेची एक किलो चांदी आज किरकोळ घसरणीसह ६१,५०० रुपयांवर पोहोचली आहे.
९९९ शुद्धतेचे १० ग्रॅम सोने आज २७९रुपयांनी महागले असून ९९५ शुद्धतेचे १० ग्रॅम सोने आज ७६० रुपयांनी महागले आहे. त्याचबरोबर ९१६ शुद्धतेचे सोने २७८ रुपयांनी, ७५० शुद्धतेचे सोने २५६ रुपयांनी आणि ५८५ शुद्धतेचे सोने १६४ रुपयांनी महागले आहे. दुसरीकडे, एक किलो चांदीच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, आज ते १४६ रुपयांनी महागले आहे. सराफा बाजारातील तज्ज्ञांनुसार येत्या काही दिवसांत सोन्याबरोबरच चांदीच्या दरात आणखी वाढ होणार असून या दोन्हीच्या वाढत्या किमती पुन्हा एकदा विक्रमी किमतीचा पल्ला गाठू शकतात.