Home क्राईम अचानक बसने पेट घेतला आणि 20 जणांचा जागीच मृत्यू…

अचानक बसने पेट घेतला आणि 20 जणांचा जागीच मृत्यू…

0 second read
0
0
45

no images were found

अचानक बसने पेट घेतला आणि २० जणांचा जागीच मृत्यू…

यमन : बसने प्रवास करणाऱ्यांवर काळाने मोठा आघात केला. कोणी शाळेत जात असेल कोणी बाहेर गावी निघालं असेल तर कुणी कामानिमित्ताने बाहेर, या सगळ्यांना मृत्यूनं अचानक भयानक रस्त्यात गाठलं आणि मोठा अनर्थ घडला.बसने अचानक पेट घेतल्यामुळे २० प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला असून, ३० प्रवासी जखमी झाले आहेत. सौदी अरेबियाच्या नैऋत्य भागात ही घटना घडली असून, संबंधित घटने नंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.बसचा ब्रेक फेल झाल्यानंतर ती पुलावर आदळली आणि उलटल्यानंतर बसला आग लागली. यामध्ये २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

अपघाताची माहिती पोलीस आणि स्थानिक प्रशासनाला मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Load More Related Articles

Check Also

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या हस्ते डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा सन्मान:- मंत्री अनुप्रिया पटेल यांच्याहस्ते विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी स्वीकारला पुरस्कार 

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या हस्ते डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा सन्मान:- मंत्री अनुप्रि…