no images were found
आईनेच चार वर्षीय मुलीला चाकूनं भोसकून ठार मारलं
पुणे : पुण्यातून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. या घटनेत आईनेच पोटच्या चार वर्षीय मुलीचा चाकूने भोसकून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना हडपसर परिसरात घडली. वैष्णवी महेश वाडेर ( वय ४ ) असं खून झालेल्या मुलीचं नाव आहे.
ही घटना रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास हडपसर येथील सिद्धिविनायक दुर्वांकुर सोसायटी ससाणे नगर येथे घडली आहे. नवरा बायको दोघांच्या वादात लेकीचा बळी याप्रकरणी तिची आई कल्पी हिला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.मुलीचा खून कोणत्या कारणातून केला, हे मात्र अद्याप समजू शकलं नाही. आरोपी कल्पना ही तिच्या मुलीसोबत एकटीच राहत होती.महिला बेकरी प्रॉडक्ट विक्रीचा व्यवसाय करत होती. कल्पना सोमवारी भाड्याचे घर खाली करणार होती. त्यामुळे घरमालक तिथे गेले होते.
त्यावेळी तिने दरवाजा आतून बंद करून घेतला होता. शेजारच्यांनी तिला दरवाजा उघडण्यास सांगितलं. घरमालक आणि शेजाऱ्यांनी आत जाऊन पाहिलं असता मुलीचा मृतदेह दिसून आला. यानंतर त्यांनी तत्काळ याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. यावर हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला ताब्यात घेतलं आहे. या हत्येमागील कारणाचा शोध घेतला जात आहे.