no images were found
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेरील प्रवास महागला
मुंबई : पुणे – मुंबई एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. १ एप्रिलपासून एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करताना आता अतिरिक्त टोल भरावा लागणार आहे. त्यामुळे खिसा आणखी गरम होणार आहे. 1 एप्रिल 2023पासून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील टोल 18% ने वाढणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दर तीन वर्षांनी टोल वाढीबाबत अधिसूचना काढण्यात येते. त्यानुसारच ही टोल वाढ करण्यात येते अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
पुणे – मुंबई एक्स्प्रेस वे हा प्रवाशांना जलद गतीने प्रवास करता यावा आणि प्रवाशांना लवकर पोहचता यावे यासाठी तयार करण्यात आला आहे. मात्र आता टोल वाढ होणार असल्याने मोठा भुर्दंड प्रवाशी नागरिकांना सहन करावा लागणार आहे. एप्रिलपासून 94 किमी स्पीड कॉरिडॉरवर वन-वे टोल पूर्वी 270 रुपये द्यावा लागत होता तो आता 320 रुपये द्यावा लागणार आहे. कारसाठी पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी टोलमध्ये पूर्वी 270 रुपये होते ते आता 360 रुपये खर्च करावे लागणार आहेत.
अनेकदा या महामार्गावर सुविधा नसल्याने अपघाताला सामोरे जावे लागते. त्यामुळे हा महामार्ग नेहमी चर्चेत असतो. या महामार्गावर टोल वाढ दर तीन वर्षांनी केली जाते. मात्र सुविधा मात्र पुर्ण मिळत नसल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येते. त्यामुळे तुम्ही टोल वाढ करा पण सुविधा देखील तशा पुरवा अशी मागणी प्रवाशांकडून करण्या त येत आहे.