
no images were found
दिलखुलास या कार्यक्रमात सातारा पोलिस अधिक्षक समीर शेख यांची मुलाखत
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा जिल्हा पोलिस अधिक्षक समीर शेख यांची कायदा व सुव्यवस्था या विषयावर मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. ही मुलाखत शनिवार दि. २० एप्रिल २०२४ रोजी, आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत सातारा जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी घेतली
आहे.
सातारा जिल्ह्यातील जिल्हा पोलिस प्रशासनाची निवडणुकीच्या अनुषंगाने पुर्वतयारी, समाज माध्यमा वरती असलेली नजर, मतदान केंद्र आणि मतमोजणीच्या दिवशी केलेली व्यवस्था, बंदोबस्त, सभा, रॅली यासाठी परवानगी, जाहीर सभांचे चित्रिकरण या बाबत दिलखुलास कार्यक्रमातून सातारा जिल्हयाचे पोलिस अधिक्षक समीर शेख यांनी माहिती दिली आहे.