
no images were found
डॉ. तानाजी महादेव चौगुले यांची एन.एस.एस.च्या संचालकपदी निवड
कोल्हापूर : कुरुकली येथील भोगावती महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. तानाजी महादेव चौगुले यांची शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या संचालकपदी निवड झाली आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के यांनी तीन वर्षाच्या कालावधीसाठी ही नियुक्ती केली आहे.
डॉ. चौगुले यांना अध्यापनाचा 23 वर्षांचा अनुभव आहे. त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यातून त्यांची शैक्षणिक व संशोधकीय गुणवत्ता त्यांनी सिद्ध केली आहे. त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. गेली चार वर्षे ते महाविद्यालयीन राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. संघटनात्मक आणि सामाजिक कार्यक्षेत्रातील त्यांचा अनुभव दांडगा आहे.