Home क्राईम नावडत्या पतीचा नवविवाहित पत्नीने गळा आवळून केला खून

नावडत्या पतीचा नवविवाहित पत्नीने गळा आवळून केला खून

0 second read
0
0
37

no images were found

नावडत्या पतीचा नवविवाहित पत्नीने गळा आवळून केला खून

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका तांडा येथे पती आवडत नव्हता म्हणून त्याचा गळा आवलून पत्नीनेच खून केल्याची खळबळजनक प्रकार घडला आहे. पांडुरंग चव्हाण असे मृताचे नाव आहे. त्याचं शितल नावाच्या मुलीशी लग्न झालं होतं. परंतु लग्न झाल्यापासून शितल पतीला कायम धुसफूस करायची. तू मला आवडत नाहीस, असं ती म्हणायची. एकेदिवशी त्याचा मृत्यू झाला. या संशयास्पद मृत्यूमुळे नातेवाईकही संतप्त झाले होते. पोलिस ठाण्यात नातेवाईकांनी राडा घातलेला..
ज्या नवविवाहित तरुणचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्याचा खुलासा आता झाला आहे. चक्क पत्नीनेच पती आवडत नव्हता म्हणून त्याचा गळा आवळला. या प्रकरणाचा पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली. पती आवडत नसल्याने शितलनेच पतीचा गळा आवळून खून केल्याचं स्पष्ट झालंय. शीतलनेच या गुन्ह्याची कबुली दिली आहे. लग्नाची हळद निघाली नाही तोच शीतलने पतीचा खून केला. गेवराई पोलिस ठाण्यामध्ये याप्रकरणी शितलविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे. पांडुरंग चव्हाणच्या आईने याबाबतची तक्रार दिली होती. त्यानंतरच हा प्रकार उघड झाला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…