
no images were found
फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावी-बारावी परीक्षेच्या २ पेपरमध्ये १ दिवसाची सुटी
दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक बोर्डाने निश्चित केले असून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळावा यासाठी पेपरमध्ये १ दिवसाची सुटी दिली जाईल.
गेल्या वर्षी कोरोनामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा गावोगावच्या शाळा, महाविद्यालयात झाल्या. सध्या कोरोनाचा धोका टळल्याने विद्यार्थ्यांची परीक्षा पूर्वीच्या परीक्षा केंद्रांवरच होईल. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रात्यक्षिक परीक्षा देखील पारदर्शकपणे होऊ शकली नव्हती. कोरोन काळात शासकीय निर्बंधांमुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने अभ्यासक्रमामध्ये २५ टक्के कपात करण्यात आली होती. आता संपूर्ण अभ्यासक्रमावर (१०० टक्के) परीक्षा होईल, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. परीक्षेचे अर्ज भरून झाले असून आता परीक्षेची तयारी युध्दपातळीवर सुरु झाली आहे. प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रवारीपासून तर दहावीची परीक्षा २ मार्चपासून सुरु होणार आहे.