मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन कोल्हापूर: बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्यनेते आणि मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांचा दि.०९ फेब्रुवारी रोजी होणारा वाढदिवस समस्त शिवसैनिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. राज्याचे लाडके मुख्यमंत्री ठरलेल्या मा.ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांचा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. याअनुषंगाने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यभर विविध आरोग्य विषयक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा उपक्रम राबविले …