no images were found
“राजर्षी छत्रपती शाहू महाराज: ऐतिहासिक माहितीपट निर्मिती’’ कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर (प्रतिनिधी) :-राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या पत्रकारिता आणि
जनसंवाद अधिविभागाच्यावतीने ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज माहितीपट महोत्सव २०२३’ चे आयोजन दिनांक २७ व २८
एप्रिल २०२३ रोजी केले आहे. यानिमिताने अधिविभागाच्या अनुषंगाने 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज: ऐतिहासिक माहितीपट
निर्मिती' याविषयावर दोन दिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन केले होते. ही कार्यशाळा विद्यापीठाचे अर्थशास्त्र
अधिविभागाचे सभागृहात दिनांक १० व ११ एप्रिल रोजी पार पडली. या कार्यशाळेत पत्रकारीता व जनसंवाद अधिविभागातील
सर्व विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी तसेच प्राध्यापक यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी कार्यशाळेचे उद्घाटन निमंत्रित मार्गदर्शक कोल्हापूर पुरालेखागारचे अधिकारी
गणेशकुमार खोडके यांच्या हस्ते झाले. प्रथम सत्रात खोडके यांनी शाहू महाराजांचे आदर्श हे शिवाजी महाराज होते, स्वतः ते
शिवरायांच्या प्रेरणेतून समाजाच्या सर्वांगीण विकास घडवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले, असे सांगितले. याचे अनेक
पुरावे आजही कोल्हापूर अभिलेखागारामध्ये उपलब्ध आहेत. शिवाजी महाराजांची सुमारे २३९ पत्रे उपलब्ध आहेत. त्यापैकी ३९
पत्रे आज कोल्हापूर अभिलेखागारात उपलब्ध आहेत. याशिवाय राजर्षी शाहू महाराजांची अनेक प्रशासकीय कागदपत्रे, ठराव, पत्रे
अभिलेखागारात उपलब्ध असून अनेक ऐतिहासिक घटना आणि निर्णयांचा संदर्भ देत विद्यार्थांनी माहितीपट निर्मितीसाठी
संदर्भ म्हणून त्यांचा वापर करावा. असे त्यांनी प्रतिपादन केले.