
no images were found
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ‘आनंदाचा शिधा’ प्राप्त लाभार्थ्यांशी साधणार संवाद
कोल्हापूर : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आनंदाचा शिधा व अन्य योजनांच्या लाभार्थ्याशी मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री दि. 13 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 4.30 वाजता संवाद साधणार आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिली आहे.
उद्दिष्ट :-सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरीत करण्यात येणाऱ्या शिधा जिन्नसांचे वितरण पात्र लाभार्थ्यांना होत आहे किंवा कसे, याबाबत लाभार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणे तसेच रास्तभाव दुकानांमार्फत योजनेचा लाभ घेताना अडचणी/समस्या येत असल्यास त्या जाणून घेणे. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रीया जाणून घेणे.
संवादासाठी निवडण्यात आलेल्या योजना:- “आनंदाचा शिधा” संचाचे वितरण, राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशी (बोनस) व शिवभोजन थाळी या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांपैकी प्रत्येक जिल्ह्यातील सुमारे 50 लाभार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे संवाद साधणार आहेत. संबंधित लाभार्थी जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसी मधील व्हीसी रुममध्ये उपस्थित राहतील.