कोल्हापूर हद्दवाढीवर महानगरपालिका निवडणूकीनंतर निर्णय : उदय सामंत मुंबई – कोल्हापूर महानगरपालिकेच्या लगतच्या 42 गावांचा समावेश कोल्हापूर महानगरपालिकेत करून हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले. याबाबतची लक्षवेधी सूचना विधानसभा सदस्य जयश्री जाधव यांनी मांडली होती. शहराची हद्दवाढ 50 वर्षांपासून रखडली आहे. त्यातून राज्य व …