
no images were found
एचडीएफसी लाइफचा गॅरंटीड इन्कम इन्श्युरन्स प्लॅन तुमच्या व तुमच्या कुटुंबियांच्या सुरक्षित
मुंबई: एचडीएफसी लाइफ या भारतातील आघाडीच्या जीवन विमाकर्त्यांतर्फे एचडीएफसी लाइफ गॅरंटीड इन्कम इन्श्युरन्स प्लॅन सुरू करण्यात आला आहे. हे उत्पादन तुम्हाला खात्रीलायक, नियमित, करमुक्त लाभ आणि खात्रीलायक मृत्यूपश्चात लाभ देते.
एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील विविध टप्प्यांमधील आवश्यकतांची पूर्तता करणारी उत्पादने उपलब्ध करून देण्याचा एचडीएफसी लाइफकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येतो. एचडीएफसी लाइफ गॅरंटीड इन्कम इन्श्युरन्स प्लॅनसह कंपनीतर्फे ग्राहकांना निधीसंचय उभारण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते. या निधीमुळे त्यांना नियमित व खात्रीलायक उत्पन्न मिळत राहू शकेल.
प्रत्येक जबाबदार व दीर्घकालीन आर्थिक ध्येये असलेल्या व्यक्तीसाठी जीवन विमा ही गरज आहे. एचडीएफसी लाइफ गॅरंटीड इन्कम इन्श्युरन्स प्लॅन या ध्येयांची पूर्तता करण्यासाठी सक्षम करतो.
या लाँचच्या वेळी एचडीएफसी लाइफच्या प्रोडक्ट्स अँड सेगमेंट विभागाचे प्रमुख अनीश खन्ना म्हणाले, “एचडीएफसी लाइफमध्ये, आमचे पॉलिसीधारक व त्यांच्या कुटुंबियांसाठी आर्थिक सुरक्षेची खात्री करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. जीवन विम्यामुळे संरक्षण आणि दीर्घकालीन बचत असे दोन लाभ मिळतात. एचडीएफसी लाइफ गॅरंटीड इन्कम इन्श्युरन्स प्लॅन खात्रीशीर परतावा देता आणि पॉलिसीधारकांना संभाव्य अनिश्चिततांपासून संरक्षण देतात. या योजनेत प्रीमिअम पेमेंट टर्म आणि जीवन विमा संरक्षणाचा पर्याय इन्कम पेआउटच्या टप्प्यातही देण्यात येतो. या योजनेचा अधिकाधिक लाभ घेतला जाईल आणि स्वतःसाठी व आपल्या कुटुंबियांसाठी आर्थिक संरक्षण मिळावे यासाठी निधीसंचय उभारण्यात येईल, अशी आम्हाला आशा आहे.”