
no images were found
मरजीनाने शेहजादासोबत विवाह करण्याला होकार दिला ?
‘अलिबाबा – एक अंदाज अनदेखा’ ही सोनी सबवरील सर्वात मोठी कौटुंबिक एंटरटेनर आहे. ही मालिका अलीच्या (अभिषेक निगम) दुष्टांविरोधातील लढ्याला व अनेक साहसी कृत्यांना दाखवते. मरजीना (मनुल चुडासामा) सापडल्यानंतर देखील अलीला तिचे मन जिंकण्यास संघर्ष करावा लागला. काळासह त्याला समजले की, मरजीनाला शेहजादाने मोहित केले आहे आणि शेहजादा खरेतर एक पशु आहे, जो त्याच्या अवतीभोवती असलेल्या अनेक लोकांना ठार करण्यासाठी जबाबदार आहे. हे सत्य समजण्यापर्यंत अली असहाय्य होऊन जातो.
आगामी एपिसोड्समध्ये पाहायला मिळेल की, मरजीना शेहजादासोबत विवाह करण्याला होकार देते. हा विवाह होत असल्यामुळे अली पशूविरोधात असहाय्य होऊन जातो. आपल्या जीवनातील प्रेमिकेला वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून अली योजना आखेल का की मरजीना व त्याच्या प्रेमकथेचा हा शेवट असेल?
मरजीनाची भूमिका साकारणारी मनुल चुडासामा म्हणाली, ‘‘मरजीना व अली सुरूवातीपासूनच एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. मरजीनाला अजूनही तिच्या गतकाळाबाबत काहीच आठवत नाही, ज्यामुळे अलीचे प्रेम समजणे तिच्यासाठी मोठे आव्हान आहे. तिला शेहजादाच्या खऱ्या ओळखीबाबत देखील माहित नाही. मला वाटते की, प्रेक्षकांना या आठवड्यातील एपिसोड आवडेल. हा एपिसोड अनेक ड्रामा, प्रेम व साहसाने भरलेला असणार आहे.’’