
no images were found
महापालिका चषक फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ
कोल्हापूर : महापालिका चषक फुटबॉल स्पर्धेस आजपासून उत्साहात प्रारंभ करण्यात आला. छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शाहू महाराज, खासदार संजय मंडलिक, आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांचे रोपटे देऊन स्वागत केले. या स्पर्धेमध्ये शहर हद्दीतील 14 नामांकित संघांनी सहभाग घेतला आहे. यावेळी उप-आयुक्त रविकांत आडसूळ, सहा.आयुक्त विनायक औंधकर, उपशहर अभियंता नारायण भोसले, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, जल अभियंता हर्षजीत घाटगे, मुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, नगरसचिव सुनिल बिद्री, आरोग्य अधिकारी डॉ.रमेश जाधव, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, माजी महापौर निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, आर्जुन माने, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, माजी नगरसेवक विनायक फाळके, अशोक जाधव, विजयसिंग खाडे पाटील, राजसिंह शेळके, माणिक मंडलिक आदी उपस्थित होते.
यानंतर दुपारी 4 वाजता पहिला सामना संयुक्त जुना बुधवार पेठ विरुध्द कोल्हापूर पोलिस यांच्यामध्ये खेळविण्यात आला. हा सामना संयुक्त जुना बुधवार पेठने 7 विरुध्द 1 गोलने जिंकला. पुर्वार्धात कोल्हापूर पोलिस संघाच्या अजित पोवार ने 1 गोल नोंदवून 1-0 अशी आघाडी संघास मिळवून दिली. उत्तरार्धात संयुक्त जुना बुधवार पेठच्या अभिषेक भोपळे याने 1 गोल नोंदवून संघास 1-1 अशी बरोबरी मिळवून दिली. यानंतर अभिषेक भोपळे याने 1 गोल, अनिकेत जोशी याने 4 गोल व निलेश सावेकर याने 1 गोल नोंदवून संयुक्त जुना बुधवार पेठने हा सामना 7 विरुध्द 1 गोलने जिंकला. संयुक्त जुना बुधवार पेठच्या अनिकेत जोशी याने 4 गोल केल्याने त्याचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून उप-आयुक्त रविकांत आडसूळ यांच्या हस्ते जर्सी देऊन सत्कार करण्यात आला.
फुटबॉल स्पर्धेच्या ठिकाणी सिक्युरिटीसाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडील कर्मचारी, प्रथोमोपचार व्यवस्थेसाठी महापालिका आरोग्य विभागाकडील ऍ़म्ब्युलन्स व फिजोओथेरपीस्ट उपलब्ध केले आहेत.
मंगळवार, दि.7 मार्च रोजी दुपारी 4.00 वाजता फुलेवाडी फुटबॉल क्रिडा मंडळ विरुध्द बीजीएम स्पोर्टस यांच्यात सामना खेळविण्यात येणार आहे.