
no images were found
अभ्यास मंडळाच्या झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठातील विविध अभ्यास मंडळांच्या अध्यक्षपदांच्या निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. शिवाजी विद्यापीठात एकूण २७ अभ्यास मंडळांचे गठन झाले आहे. सदर अभ्यास मंडळांचे अध्यक्ष निवडण्यासाठीची अधिसूचना दि. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी निर्गमित करण्यात आली होती. त्यानुसार, प्रत्यक्ष निवडणूका होवून विविध अभ्यास मंडळांच्या अध्यक्षांची निवड जाहीर करण्यात आली.
यातील, १५ अभ्यास मंडळांसाठी अध्यक्षांची निवड बिनविरोध करण्यात आली. त्यांची नावे पुढीलप्रमाणे- डॉ. कुचे किशोर डी. (गणित अभ्यास मंडळ), डॉ. गायकवाड सुनिल मधुकर (प्राणीशास्त्र), डॉ. मुणवल्ली गुरू रामचंद्र (स्थापत्य अभियांत्रिकी), डॉ. भाटिया मनिष सुदेश (औषध निर्माणशास्त्र), डॉ. मारूलकर केदार विजय (वाणिज्य), डॉ. कुलकर्णी शर्वरी शरद (व्यवस्थापन), डॉ. कदम नंदकुमार लक्ष्मण (लेखापरीक्षण), डॉ. कांबळे पी. एस. (व्यावसायिक अर्थशास्त्र), डॉ.करेकट्टी त्रृप्ती किसन (इंग्रजी), डॉ. इंगळे जयवंत शंकरराव (अर्थशास्त्र), डॉ. भणगे रविंद्र पांडुरंग (राज्यशास्त्र), डॉ. नाईक चंद्रवदन मोहनराव (इतिहास), डॉ. कांबळे अर्चना राजकुमार (समाजशास्त्र), डॉ. मर्जे भरमू पारिसा (शिक्षणशास्त्र), डॉ. पवार निशा हरिलाल (पत्रकारिता).
सात अभ्यास मंडळासाठी आज प्रत्यक्ष मतदान होऊन अध्यक्षांची निवड करण्यात आली. यामध्ये पुढीलप्रमाणे अध्यक्ष निवडल्याचे जाहीर करण्यात आले. डॉ. कोळेकर एस. एस. (रसायन व रसायन तंत्रज्ञान), डॉ. शाह प्रशांत प्रभाकर (इलेक्ट्रॉनिक्स), डॉ. गुरव राजाराम विठोबा (वनस्पतीशास्त्र), डॉ. जाधव बाळासाहेब साऊबा (भूगोल व भूशास्त्र), डॉ. घोरपडे विजय राम (संगणकशास्त्र), डॉ. रणधीर शिंदे (मराठी), डॉ.सावंत सातप्पा शामराव (हिंदी).
पाच अभ्यास मंडळांसाठी एकाही पात्र उमेदवाराने आपले नामनिर्देशन न भरल्याने अध्यक्षपदे रिक्त राहिली आहेत.