
no images were found
आज शिंदे-फडणवीस सरकार सादर करणार अर्थसंकल्प
मुंबई : आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. आज दुपारी विधानसभेत अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तर विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांच्यावर सोपवण्यात आल आहे.अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही, त्यामुळे अर्थराज्यमंत्री नसल्यानं विधान परिषदेत दीपक केसरकर हे अर्थसंकल्प मांडणार आहेत. जनतेच्या सूचना राज्याचा अर्थसंकल्प कसा असावा, त्यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असावा, काय तरतूद अपेक्षित आहे, यासाठी राज्यशासनाकडून जनतेच्या सूचना मागवण्यात आल्या होत्या. सर्वसामान्यांच्या सूचना समोर ठेवून हा अर्थसंकल्प बनवण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे फडणवीस हे राज्यातील जनतेसाठी काय घोषणा करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अर्थसंकल्पामध्ये कोणत्या क्षेत्रासाठी किती तरतूद करण्यात येणार? सर्वसामान्यांसाठी काय काय घोषणा करण्यात येणार याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. आजच्या अर्थसंकल्पात जुन्या योजनांसाठी भरपूर तरतूद करण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच नव्या योजनांही लागू करण्याची शक्यता आहे. शेती क्षेत्राला दिलासा मिळण्याची शक्यता 2022- 2023 या आर्थिक वर्षामध्ये शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. खासकरून आरोग्य आणि कृषी या दोन क्षेत्रावर आजच्या अर्थसंकल्पात काय तरतूद असणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच राज्यात निवडणुका असल्यानं काही लोकप्रिय घोषणा सरकार करू शकते अशी देखील चर्चा आहे.