स्त्रियांनी दैनंदिन जीवनामध्ये सकस आहाराबरोबरच आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे – डॉ. भारती अभ्यंकर.
कोल्हापूर – येथील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग संचलित, न्यू कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
जागतिक महिला दिनानिमित्त येथील न्यू कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये बोलताना कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. भारती अभ्यंकर यांनी दैनंदिन जीवनामध्ये महिलांनी नियमित शारीरिक तपासणी करणे, स्त्रियांच्या विविध शारीरिक तक्रारी यांवरील उपाय यांच्यावर विशेष मार्गदर्शन केले. त्याचबरोबर दैनंदिन व्यायाम पौष्टिक व सकस आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक प्राचार्य डॉ. रवींद्र कुंभार यांनी केले व उपस्थितांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पाहुण्यांचा परिचय कुमारी अंजली पाटील हिने केला. यावेळी सुरज अभिवंत, , वैष्णवी परीट, मेहजबीन बक्शु या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पियुषा नेजदार यांनी केले. सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे विकास अधिकारी डॉ संजय दाभोळे, प्राचार्य डॉ. रवींद्र कुंभार, डॉ. सचिन पिशवीकर यांचे मार्गदर्शन लाभले सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. पियुषा नेजदार, प्रा. सुजित साळोखे, सौ वर्षा शिंदे, सीमा साळोखे, व अर्जुन चौगुले यांनी विशेष परिश्रम घेतले.