no images were found
सॅमसंग इंडियाकडून उत्साहवर्धक सॅमसंग फायनान्स+ ऑफर्स लाँच;
· ग्राहकांना आता फक्त ५ मिनिटांत फायनान्स मंजुरी मिळू शकते.
· सॅमसंग फायनान्स+ ग्राहकांचा अनुभव अधिक उत्साहवर्धक करण्यासाठी आणि सुलभता वाढवण्यासाठी पूर्णपणे डिजिटल व कागदविरहित प्रक्रिया उपलब्ध करून देते.
गुरुग्राम– सॅमसंग इंडियाने देशभरातील ग्राहकांसाठी आपले स्मार्ट होम अप्लायन्सेस अधिक सुलभरित्या उपलब्ध करण्यासाठी सॅमसंग फायनान्स+ अंतर्गत नवीन योजना लाँच केल्या आहेत. ग्राहक आता सॅमसंगचे अप्लायन्सेस जसे रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स, एसी आणि मायक्रोवेव्ह खरेदी करण्यासाठी सुलभ फायनान्स पर्यायांचा लाभ घेऊ शकतात. ही सेवा देशभरातील ८००० हून अधिक स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे.
सॅमसंग फायनान्स+ खरेदीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी डिझाइन केले आहे. यातील ‘ईझी ईएमआय फॉर ऑल’ पर्यायाद्वारे फक्त पाच मिनिटांत पूर्णपणे डिजिटल आणि कागदविरहित प्रक्रिया पूर्ण होते. दिवसाला फक्त ३३ रुपयांपासून सुरू होणाऱ्या परवडणाऱ्या ईएमआय पर्यायांमुळे हे सोल्यूशन पहिल्यांदाच कर्ज घेणाऱ्यांसाठी आणि ज्यांची कोणतीही क्रेडिट हिस्ट्री नाही अशा व्यक्तीसाठी अत्यंत सोयीचे आहे. या लाँचला अधिक उत्साहात साजरे करण्यासाठी सॅमसंग फायनान्स+ वापरून केलेल्या खरेदीवर सॅमसंग मर्यादित कालावधीसाठी १००० रुपयांची विशेष सुरूवातीची कॅशबॅक देखील देत आहे.
“सॅमसंगमध्ये आम्ही अर्थपूर्ण डिजिटल नाविन्यतेच्या माध्यमातून आमचे उत्पादन अधिक सुलभरित्या उपलब्ध करण्याप्रती कटिबद्ध आहोत. सॅमसंग फायनान्स+ ग्राहकांना त्याच्या खिशावर अधिक भार न देता अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देते. आमच्या नवीन ऑफर्ससह आम्ही भारतातील कुटुंबांसाठी नाविन्यतेचा स्वीकार करणे आणि त्यांची घरे अपग्रेड करणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे करत आहोत,” असे सॅमसंग इंडियाच्या डिजिटल अप्लायन्सेसचे उपाध्यक्ष गुफरान आलम म्हणाले.
सॅमसंग इंडिया सातत्याने नवनवीन शोध आणि ग्राहक-केंद्रित उपाय सादर करत आहे, ज्यामुळे प्रगत तंत्रज्ञान सर्वांसाठी उपलब्ध होण्याची खात्री मिळते. सॅमसंग फायनान्स+च्या माध्यमातून कंपनी आपल्या वैविध्यपूर्ण ग्राहक वर्गासाठी परवडणारे आणि त्रासमुक्त फायनान्स पर्याय प्रदान करण्याची आपली कटिबद्धता अधिक दृढ करत आहे. ग्राहक त्यांच्या आधार आणि पॅन कार्डसह सहभागी स्टोअर्सना भेट देऊन या फायनान्स सुविधांचा लाभ घेऊ शकतात.
सॅमसंगची बीस्पोक एआय अप्लायन्स लाइनअप भारतातील आधुनिक कुटुंबांसाठी अत्यंत वैयक्तिकृत, ऊर्जा-कार्यक्षम आणि सुरक्षित स्मार्ट होम सोल्यूशन्स प्रदान करते. एआय होम स्क्रीन इंटरफेस, नैसर्गिक संवाद साधणारा बिक्स्बी वॉईस असिस्टंट, सॅमसंग नॉक्स सुरक्षा आणि स्मार्टथिंग्स कनेक्टिव्हिटीद्वारे सुसज्ज असलेली अप्लायन्सेस विनाव्यत्यय समन्वय आणि ग्राहकांचा अनुभव अधिक उत्साहवर्धक करण्याची खात्री देतात.
अधिक माहितीसाठी किंवा सॅमसंग डिजिटल अप्लायन्सेसची श्रेणी पाहण्यासाठी तुमच्या जवळच्या सहभागी स्टोअरला भेट द्या किंवा सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.