Home उद्योग सॅमसंगचे नवीन बीस्‍पोक एआय विंडफ्री एसी तापमान वाढत असताना भारतातील कुटुंबांना देणार इंटेलिजण्‍ट कूलिंगचा अनुभव

सॅमसंगचे नवीन बीस्‍पोक एआय विंडफ्री एसी तापमान वाढत असताना भारतातील कुटुंबांना देणार इंटेलिजण्‍ट कूलिंगचा अनुभव

21 second read
0
0
7

no images were found

सॅमसंगचे नवीन बीस्‍पोक एआय विंडफ्री एसी तापमान वाढत असताना भारतातील कुटुंबांना देणार इंटेलिजण्‍ट कूलिंगचा अनुभव

गुरुग्राम: सॅमसंग इंडियाने बीस्‍पोक एआय विंडफ्री इन्व्हर्टर स्प्लिट एसी श्रेणी लाँच केली आहे. यामध्ये विविध विभागांतील २३ मॉडेल्सचा समावेश आहे आण्एिा त्यांची किंमत ३२,९४० रुपयांपासून सुरू होते. हे नवीन एसी एआय फास्ट आणि कंफर्ट कूलिंग तंत्रज्ञानाने सज्ज आहेत, तसेच एआय एनर्जी मोड ३० टक्‍क्‍यांपर्यंत ऊर्जेची बचत करतात.

सॅमसंगची एआय फास्ट व कंफर्ट कूलिंग यंत्रणा वापरकर्त्याच्या वापराच्या पद्धतींचे आणि रूममधील परिस्थितीचे आपोआप विश्‍लेषण करते. त्यानंतर त्वरित थंडावा देण्यासाठी फास्ट कूलिंग मोड सक्रिय करते, ज्यामुळे ग्राहकांना कडक उन्हात त्वरित थंडावा आणि आराम मिळतो.

रूममधील तापमान इच्छित पातळीपर्यंत खाली आले की, एआय तंत्रज्ञान आपोआप विंडफ्री™/ड्राय कंफर्ट मोडवर स्विच होते, ज्यामुळे वापरकर्त्याच्या गरजेनुसार थंडावा कायम राखला जातो. हे तंत्रज्ञान हजारो सूक्ष्म छिद्रांमधून अतिशय हलक्या स्‍वरूपात थंड हवा पसरवून खोलीतील हवामान संतुलित राखते, ज्यामुळे अंगावर येणारे थंड हवेचे थेट आणि बोचरे झोत टाळले जातात. संपूर्ण कार्यप्रणाली दरम्यान एआय सतत रूममधील परिस्थिती आणि वापरकर्त्याच्या आवडीनिवडींचे विश्‍लेषण करून कूलिंगमध्ये सुधारणा करत राहते.

स्मार्ट थिंग्स एकीकरणामुळे हे बीस्‍पोक एआय विंडफ्री एसी घरातील कूलिंग अधिक स्मार्ट आणि कनेक्टेड बनवते. वापरकर्ते स्मार्ट थिंग्स अॅपद्वारे दूरूनही तापमान नियंत्रित करू शकतात, विजेच्या वापराचे निरीक्षण करू शकतात आणि एसीचे कार्य स्वयंचलित करू शकतात. यामध्ये एनर्जी मॉनिटरिंग, व्हॉइस कंट्रोल, वेलकम/अवे केअर आणि स्मार्ट थिंग्स होम केअर यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत, जी ग्राहकांच्या सोयीसाठी आणि मनःशांतीसाठी सक्रिय नियंत्रण व देखभाल सुनिश्चित करतात.

एआय एनर्जी मोड वापराच्या पद्धती आणि पर्यावरणीय परिस्थितीचे विश्‍लेषण करून कॉम्प्रेसरची कार्यक्षमता सुधारतो, ज्यामुळे ऊर्जेच्या वापरात ३० टक्‍क्‍यांपर्यंत घट होते. या नवीन एसी श्रेणीमध्‍ये कमाल कूलिंग आणि ऊर्जा कार्यक्षमता यांचे संयोजन आहे. या एसीमधील प्रगत इन्व्हर्टर तंत्रज्ञान अतिशय कडक तापमानातही स्थिर कामगिरी सुनिश्चित करते, ज्यामुळे हे एसी भारतातील वैविध्यपूर्ण हवामानासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.

बीस्‍पोक एआय एअर कंडिशनर्सची ही नवीन श्रेणी फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि Samsung.com सह प्रमुख रिटेल आउटलेट्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग
Comments are closed.

Check Also

कोल्हापूरच्या विकासाचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूरच्या विकासाचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर कोल्ह…