no images were found
हो, तिला (स्त्री)आज ही रस्त्यावर उतरावे लागते…
८ मार्च जागतिक महिला दिन निमित्तचा हा लेख… रेखा दामुगडे
महिला दिन हा ८ मार्चला का साजरा केला जातो हे कदाचित कोणाला माहितीही नसेल तर……
न्यूयाॅर्क येथील हजारो महिला सकाळ पासून रात्री अंधार पडे पर्यंत शिलाई मशीनवर काम करत होत्या. त्यामानाने त्यांना कामाचा मोबदला मिळत नसे.म्हणून या महिलां एकजुटीने आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरल्या.मागण्या दोनच होत्या एक म्हणजे कामाची वेळ आठ तासाची करा.आणि दुसरे म्हणजे कामाचा योग्य मोबदला दया.महिलांच्या या मोर्चाला उधळून लावण्यासाठी सत्ताधा-यांनी पोलिसा करवी अश्रूधुराचा वापर करून लाठी चार्ज करायला लावला.यामध्ये अनेक महिला जखमी झाल्या.दोन महिला शहीद झाल्या.तरी ही जखमी महिला मागे हटल्या नाहीत.त्यांनी आपल्या मागण्या मान्य करूनच घेतल्या.न्याय हक्कासाठी लढायला महिला ज्या दिवशी पहिल्यांदाच रस्त्यावर आल्या. तो दिवस म्हणजे ८ मार्च १८५७ त्या दिवसा पासून ८ मार्च हा दिवस आंतर राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो
स्वराज्य निर्मिती करताना शिवबाला लढायची प्रेरणा देणाऱ्या माॅ जिजाऊ .नंतरच्या काळात स्त्री शिक्षणासाठी लढणाऱ्या आमच्या सावित्रीबाई फुले अश्या लढवय्या स्त्रीयांनी आमच्या देशात आदर्श निर्माण केला.स्त्रीयावर अत्याचार करणारे फक्त पुरूषच नसतात तर महिलांही त्यात सहभागी असतात.स्त्रीच स्त्रीची शत्रू असते.
काही दिवसापुर्वीच एका बातमी द्वारे समजले जेल मधिल महिला कैदी होत आहेत प्रेगनट वाचून तळपायाची आग मस्तकात गेली.महिला कैद्यावर लक्ष ठेवण्यासाठी महिला जेलर असताना असे प्रकार घडतातच कसे??? एखाद्या गावात एखाद्या मुलीवर आत्याचार झाला तर हजारोच्या संख्येने गावा गावातून शहरा शहरातून मोर्चे निघतात. तर जेल मधील महिला कैद्यांच्या बाबतीत घडणाऱ्याघटना दृष्टी आड का केल्या जातात??
उच्चभ्रू वस्तीत कित्येक मुली, महिला शिक्षण,नोकरीच्या नावाने कुटुंबियांच्या पालकांच्या डोळ्यात धूळ फेकून नको त्या मार्गावर जातात.नको ते उद्योग करतात.पुरूष मुलांची मानसिकता बिघडवतात.यातुन अनेक गुन्हे घडतात.
कुटूंब उध्वस्त होत आहेत.अशा वेळी कधी कधी वाटू लागते. स्त्री शिक्षणाने स्त्री नको तितक्या शहाण्या होत आहे. स्त्री आणि पुरूषांची मैत्री असायला काहीच हरकत नाही पण त्या मैत्रीत पावित्र्य जपले जावे.दोघांच्या ही घरात मैत्री बाबत माहीती असावी.चोरून लपून छपून केली जाते ती मैत्री नसते.ते नाते असते gf आणि bf चे.थोडक्यात काय तर वासना क्षमवण्यासाठी काही काळासाठी मैत्री करणे.
१८५७ साली पोटाची भूक भागविण्यासाठी कामाचा योग्य मोबदला मिळावा म्हणून रस्त्यावर उतरलेल्या महिलांचा लढा आजच्या काळात वासनेची भूक भागवून घेणाऱ्या नराधमाला शिक्षा देण्यासाठी,पिडीत महिलेला न्याय मिळवून देण्या पर्यंत पोहचला आहे.चांगल्याची निर्मीती करणं आणि वाईटाचा अंत करण हे महिला करू शकतात. एकजुट करून आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरू शकतात.पहीली अंतराळवीर महिला असो किंवा कुस्ती खेळणारी पहिली महिला.जगावेगळं नविन काही करणार्या महिलांना कोणत्याही क्षेत्रात विरोध हा होतच असतो.पण हा विरोध झिडकारून स्त्री जेव्हा यश मिळवते तेव्हा तिचे सर्वत्र कौतूक होते. हा पण एक लढाच असतो.आज एक ही क्षेत्र असे राहिले नाही ज्यात महिला नाहीत.
हम भी किसीसे कम नही हे महिलांनी दाखवून दिले आहे.
पण काही गोष्टीत महिलांनी कमीच राहिलेले बरे..स्त्री चांगल्याची निर्मिती करू शकते तसेच वाईट गोष्टीही करत आहेत. सद्य परिस्थीतीत निडर,धाडसी, कर्तृत्ववान महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न जेंव्हा निर्माण होतो.तेव्हा आज ही स्त्री सुरक्षित नसल्याचे अजूबाजूच्या घटनावरून दिसून येते. याला जबाबदार फक्त आणि फक्त पुरुष वर्गाला धरले जाते.
महिला असुरक्षित का आहेत??
कारण आजच्या पिढीला घरातून मिळणारे संस्कार कमी पडत आहेत.रंगेल विचारांचा आंबट शौकीन मित्र परिवार ,सोशल मिडीया. हेच जबाबदार आहेत.असे कित्येकजण अगदी सहज बोलुन जातात.तर नाही स्त्री कमी आणि दुबळी पडते.तिच्या आचार आणि विचाराने.कोणत्याही क्षेत्रात स्त्री स्वतहाचे संरक्षण स्वतहा करू शकते.एकजुटीने नराधमांना धडा शिकवू शकते.समाजातील वासनाधिन लांडगे ओळखण्याची दृष्टी महिलांना असताना त्या बळी का पडतात हेच समजत नाही.सेक्स रॅकेट,अल्पवयीन मुलींची विक्री, कुंटनखाना चालवणे,गुन्हेगारी,दारूविक्री, वाईट कृत्य ,अल्पवयीन मुलांना,पुरूषांना नादी लावून त्यांच्यावर बलात्कारचे गुन्हे दाखल करणा-यात ही महिलाचा सहभाग असतो.
सामाजिक स्वास्थ चांगले ठेवणे अथवा बिघडवणे हे स्त्रियांच्या हातात आहे.स्त्रीयासाठी कायदे आहेत म्हणून त्याचा गैरवापर करून पुरूषांचे विनाकारण आयुष्य बरबाद करणा-याही कित्येक महिला आहेत. कुटूंब जोडणाऱ्या महिला आहेत तसेच कुटूंब तोडणाऱ्या ही महिला आहेत.स्त्री गुन्हेगारीत वाईट कृत्यात सहभागी होऊ शकते तर.चांगल्या गोष्टी करण्यासाठी, नवनिर्मिती करण्यासाठी महिलांची संख्या का कमी असते??धाडस का करु शकत नाही? का कमी पडतात ?
स्त्रीच स्त्रीची शत्रू असते असे म्हणायचे आणि दुसरीकडे पुरुष सगळे सारखेच असे ही म्हणायचे. पर पुरुषा पासून स्त्रीला धोका होऊ शकतो या विचाराने पुरुषाशी मैत्री करणे गैर समजले जाते, टाळले जाते. समाजात काही पुरुष असे ही आहेत जे स्त्रियांचा आदर करतात. एक चांगला मित्र,भाऊ, हितचिंतक ही बनू शकतात. स्त्रीच्या सुरक्षेची जबाबदारी ही घेतात.प्रोत्साहन ही देतात.आजची परिस्थिती अशी आहे की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला वाईट मार्गाला लावू शकते, फसवणूक करु शकते.समाजात काही पुरुष असे ही आहेत जे एखादया स्त्रीचे वाईट होऊ नये,तिला धोका होऊ नये,सुरक्षित रहावी, सावध करणारे, सहकार्य करणारे हितचिंतक ही समाजात आहेत.तेव्हा मला एकच सांगायचे आहे स्त्रीयावर अत्याचार करणारे पुरूषच नसतात तर महिलांही त्यात सहभागी असतात.उलट स्त्री घराबाहेर जेवढी सुरक्षित असते तेवढी चार भिंतीच्या आत सुरक्षित आहे का?? सुरक्षित असती तर बापाकडून, भावाकडून, काका, मामा, सासरे , दीर अश्या नात्यातील व्यक्ती कडून अत्याचार झाले असते का??
८ मार्च महिला दिन साजरा करतांना महिलांनी असा निश्चय करा की स्त्रीच स्त्रीची शत्रू नसून ती हितचिंतक, प्रोत्साहन देणारी ,सहकार्य करणारी असावी.सामाजिक स्वास्थ बिघडवणारी नाही तर समाजाला घडविणारी महिला बना .
हीच ८ मार्च महिलादिना निमित्त सर्व महिलांना सदिच्छा..