इसुझु मोटर्स इंडिया भारतभरात ‘इसुझु आय-केअर विंटर कॅम्प’ राबवणार कोल्हापूर (प्रतिनिधी):- इसुझुची दर्जात्मक सेवा व मालकीहक्क अनुभव देण्याप्रती असलेली कटिबद्धता कायम राखण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नासह इसुझु मोटर्स इंडिया इसुझु डी-मॅक्स पिक-अप्स आणि एसयूव्हींच्या श्रेणीसाठी देशव्यापी ‘इसुझु आय-केअर विंटर कॅम्प’ राबवणार आहे. या सर्विस कॅम्पचा देशभरातील ग्राहकांना यंदाच्या हंगामादरम्यान त्रासमुक्त ड्रायव्हिंगच्या अनुभवासाठी उत्साहवर्धक लाभ आणि प्रतिबंधात्मक देखभाल तपासणी सुविधा देण्याचा उद्देश आहे. …