Home औद्योगिक जिल्हा उद्योग केंद्रामार्फत गुरुवारी निर्यात प्रचालन कार्यशाळा

जिल्हा उद्योग केंद्रामार्फत गुरुवारी निर्यात प्रचालन कार्यशाळा

7 second read
0
0
11

no images were found

जिल्हा उद्योग केंद्रामार्फत गुरुवारी निर्यात प्रचालन कार्यशाळा

 

कोल्हापूर, : राज्यामध्ये निर्यात क्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच रोजगार निर्मितीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि निर्यात वाढीत प्रत्येक जिल्ह्याला उत्तरदायी बनवण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने जिल्हा हे निर्यात केंद्र उपक्रमाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. एक्सपोर्ट प्रमोशन वर्कशॉप (Export Promotion Workshop) कार्यक्रमांतर्गत उद्योग संचालनालयाअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्रामार्फत अर्ध्या दिवसाची निर्यात प्रचालन कार्यशाळा गुरुवार दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2 या वेळेत राजर्षी शाहू सभागृह, शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पुणे विभागाच्या उद्योग सहसंचालकांच्या शैलेश राजपुत उपस्थितीत होणार असून यामध्ये DGFT, FIEO, APEDA, EEPC, INDIA POST या संस्थेच्या तज्ञ व्यक्तींमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 

कार्यशाळेसाठी सुक्ष्म, लघु, मध्यम उपक्रम घटक, निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमाचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यात संबंधी कामकाज करणारे घटक संशोधक, बँका इ. घटक सहभागी होणार असून जिल्ह्यातील सर्व उद्योजक, नवउद्योजक व निर्यातदार यांनी कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In औद्योगिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …