Home औद्योगिक सोनालिकाकडून किसान पुणे २०२४ प्रदर्शनामध्‍ये ३ नवीन प्रगत तंत्रज्ञान ट्रॅक्‍टर्स लाँच

सोनालिकाकडून किसान पुणे २०२४ प्रदर्शनामध्‍ये ३ नवीन प्रगत तंत्रज्ञान ट्रॅक्‍टर्स लाँच

2 min read
0
0
23

no images were found

सोनालिकाकडून किसान पुणे २०२४ प्रदर्शनामध्‍ये ३ नवीन प्रगत तंत्रज्ञान ट्रॅक्‍टर्स लाँच

पुणे,: भारतातील पहिल्‍या क्रमांकाचा ट्रॅक्‍टर निर्यात ब्रँड सोनालिका ट्रॅक्‍टर्सने महाराष्‍ट्रातील पुणे येथील किसान कृषी प्रदर्शन २०२४ मध्‍ये दृढ उपस्थिती दाखवली आहे, जेथे कंपनीने महाराष्‍ट्रातील शेतकऱ्यांसाठी सानुकूल केलेले सर्वात नाविन्‍यपूर्ण आणि हेवी ड्युटी ट्रॅक्‍टर्स दाखवले आहेत. कंपनीने ३ नवीन हेवी ड्युटी ट्रॅक्‍टर्स सादर केले आहेत – सोनालिका टायगर डीआय २६, सोनालिका चीता डीआय ३२ आणि सोनालिका टायगर डीआय ६५ सीआरडीएस ४डब्‍ल्‍यूडी, जे महाराष्‍ट्रातील खडतर जमिनीमध्‍ये अपवदात्‍मक कार्यक्षमता देण्‍यासाठी सानुकूल करण्‍यात आले आहेत. या भव्‍य लाँचला पूरक सोनालिकाने प्रभावी लाइन-अपमधील ५ आणखी नाविन्‍यपूर्ण ट्रॅक्‍टर्सना देखील दाखवले आहे, जसे सोनालिका चीता एनटी३०४डब्‍ल्‍यूडी, अपग्रेडेड सोनालिका सिकंदर डीआय ७५० ३ डीएलएक्‍स ४डब्‍ल्‍यूडी, सोनालिका टायगर डीआय ३० ४डब्‍ल्‍यूडी, सोनालिका सिकंदर डीआय ६० डीएलएक्‍स ४डब्‍ल्‍यूडी आणि सोनालिका सिकंदर डीआय ६० डीएलएक्‍स टॉर्क प्‍लस ४डब्‍ल्‍यूडी, तसेच महाराष्‍ट्र स्‍पेशल मॉडेल – सोनालिका सिकंदर डीआय ७४५ ३ डीएलएक्‍स ४डब्‍ल्‍यूडी.  

      या इव्‍हेण्‍टचे खास आकर्षण ठरले सोनालिका चीता डीआय ३२ चे लाँच, ज्‍यामध्‍ये हेवी ड्युटी ३ सिलिंडर २,७८० सीसी इंजिन, ८एफ+२आर ट्रान्‍समिशन, उच्‍च दर्जाचे ऑईल इमर्स डिस्‍क ब्रेक आणि पॉवर स्टिअरिंग, जे विविध कृषी कामासाठी प्रबळ कार्यक्षमता देतात. ‘डिझाइन इन युरोप’ टायगर सिरीजअंतर्गत सोनालिकाने कॉम्‍पॅक्‍ट पॉवरहाऊस ट्रॅक्‍टर टायगर डीआय २६ दाखवला आहे, ज्‍यामध्‍ये ३ सिलिंडर १(३१८ सीसी इंजिन, विनासायास १२एफ+४आर ट्रान्‍समिशन आणि ३ फूट अरूंद ट्रॅक आहे, जे या ट्रॅक्‍टरला ऊस शेतीसाठी योग्‍य निवड बनवतात. स्‍टॉलमध्‍ये दाखवण्‍यात आलेल्‍या प्रीमियम सोनालिका टायगर डीआय ६५ सीआरडीएस ४डब्‍ल्‍यूडीमध्‍ये ४ सिलिंडर ४,७१२ सीसी इंजिन स्‍मूद १२एफ+१२आर मल्‍टीस्‍पीड ट्रान्‍समिशन, प्रगत ५जी हायड्रॉलिक्‍स आहे, ज्‍यामुळे हा ट्रॅक्‍टर महाराष्‍ट्रातील खडतर जमिनीमधील उच्‍च-स्‍तरीय कृषी कामांसाठी खरा गेम चेंजर आहे.  

      या विशेष प्रसंगी आपले मत व्‍यक्‍त करत सोनालिका ट्रॅक्‍टर्सच्‍या विक्री व विपणन विभागाचे अध्‍यक्ष व प्रमुख श्री. विवेक गोयल म्‍हणाले, ”महाराष्‍ट्र विभिन्‍न जमिन प्रकारांसह अद्वितीय बाजारपेठ आहे आणि किसान कृषी प्रदर्शन २०२४ लँडमार्क इव्‍हेण्‍ट ठरला आहे, ज्‍याने महाराष्‍ट्रातील शेतकऱ्यांना प्रत्‍येक कृषी गरजेची पूर्तता करणारे ट्रॅक्‍टर्स उपलब्‍ध करून दिले आहेत. आम्‍ही या प्रदर्शनामध्‍ये आमचे सर्वात प्रगत ट्रॅक्‍टर्स लाँच केले आहेत – सोनालिका टायगर डीआय २६, सोनालिका चीता डीआय ३२ आणि सोनालिका टायगर डीआय ६५ सीआरडीएस ४डब्‍ल्‍यूडी ट्रॅक्‍टर. हा प्रत्‍येक ट्रॅक्‍टर कृषी सोल्‍यूशन बेंचमार्क्‍सना नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍यासाठी आणि शेतकऱ्यांना अधिक यश व उत्‍पादकता प्राप्‍त करण्‍यास सक्षम करण्यासाठी सानुकूल करण्‍यात आला आहे. प्रदर्शनामध्‍ये शेतकऱ्यांकडून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद आम्‍हाला स्‍तर उंचावत राहण्‍यास आणि शेतकऱ्यांना त्‍यांच्‍या शेतांमध्‍ये समृद्धता आणण्‍यास मदत करणारे हेवी-ड्युटी सोल्‍यूशन्‍स वितरित करण्‍यास प्रेरित करतो.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In औद्योगिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

बचत गटांच्या चळवळीतून महिलांना आर्थिक सक्षम आणि साक्षर करूया– प्रकाश आबिटकर

बचत गटांच्या चळवळीतून महिलांना आर्थिक सक्षम आणि साक्षर करूया– प्रकाश आबिटकर   कोल्हाप…