no images were found
एनसीसीच्या वतीने राष्ट्रीय एकता दिन साजरा
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण (के.एम.सी) कॉलेजच्या व 56 महाराष्ट्र बटालियन एनसीसी कोल्हापूर सेक्टरच्या वतीने राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी अंतर्गत मिनी मॅरेथॉनचे, राष्ट्रीय एकते संदर्भात शपथ व मार्चपास असे विविध उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमामध्ये यशवंतराव चव्हाण (के.एम.सी) कॉलेज, जी.के.जी कॉलेज, शाहू दयानंद हायस्कूल, इंदिरा गांधी स्कूल, जय हनुमान हायस्कूल ईस्पुरलीच्या एन.सी.सी.चे विद्यार्थी व एन.सी.सी.चे तीन ऑफिसर सहभाग झाले होते. या मिनी मॅरेथॉनची नोंद फिट इंडिया 3.0 मध्ये करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्र.प्राचार्य डॉ.अरुण पोडमल उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन लेफ्ट डॉ अमित रेडेकर, प्रा.डी.के.नरळे, ऑफिसर अजित कारंडे, संग्राम सोनार, राजाराम चौगुले यांनी केले. या कार्यक्रमासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या उपायुक्त शिल्पा दरेकर, 56 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. चे कमांडिंग ऑफिसर कर्नल डी.एस सायना, कर्नल विजयंत थोरात, प्र.प्राचार्य डॉ.भोयेकर यांचे सहकार्य लाभले.