no images were found
सोनालिकाने लाँच केला प्रीमियम ट्रॅक्टर टायगर डीआय ५५
या प्रसंगी आपले विचार मांडताना सोनालिका ट्रॅक्टर्सचे सेल्स अँड मार्केटिंग अध्यक्ष आणि प्रमुख श्री. विवेक गोयल म्हणाले, “किसान पुणे हा भव्य कार्यक्रम असून महाराष्ट्रात आमचे हेवी ड्युटी ट्रॅक्टर आणि शेती अवजारे प्रदर्शित करण्याची ही एक उत्तम संधी आहे. ‘युरोपमध्ये डिझाइन’ केलेला आमचा नवीन आणि प्रगत सोनालिका टायगर डीआय ५५ सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. जास्तीत जास्त कृषी उत्पादकतेसाठी तो शक्तिशाली इंजिन, १२एफ प्लस ३आर कॉन्स्टंट मेश ट्रान्समिशन आणि आरामदायी आसन यांसारख्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. त्यामुळे तो ‘ग्लोबल किंग ऑफ अॅग्री’ बनला आहे. शेतकऱ्यांनी आमच्या हेवी ड्युटी ट्रॅक्टरवर विश्वास ठेवल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. शेतकऱ्यांना किफायतशीर अशा मार्गाने शेती यांत्रिकीकरणाकडे आम्ही त्यांना नेत राहू.”
प्रदर्शनादरम्यान बोलताना सोनालिका ट्रॅक्टर्सचे उपाध्यक्ष आणि विभागीय व्यवसाय प्रमुख श्री कुलदीप सिंग म्हणाले, “किसान पुणे महाराष्ट्रातील लाखो लोकांना आकर्षित करते आणि शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी ते एक उत्तम व्यासपीठ आहे. आम्ही आमचा सीआरडीएस तंत्रज्ञानासह प्रीमियम टायगर डीआय ६५ ४डब्ल्यूडी ट्रॅक्टरचे प्रदर्शन करताना आनंदित आहोत. यामुळे ३ मोडचा (पॉवर, इकॉनॉमी आणि सामान्य) लाभ मिळतो .त्यामुळे शेतकरी त्यांच्या शेतातील किंवा मैदानाबाहेरील उपयोगाला अनुरूप ट्रॅक्टरची कार्यक्षमता वाढवू शकतील. आमच्या प्रिमियम टायगर मालिकेबद्दल शेतकऱ्यांना उत्सुकता आहे, हे पाहून आनंद वाटतो. यामुळे महाराष्ट्राच्या शेतकर्यांच्या समृद्धीसाठी नवनवीन प्रयोग करण्याची आमची कटिबद्धता बळकट झाली आहे.”
नवीन सोनालिका टायगर डीआय ५५ हा ‘जागतिक शेतीचा राजा’ (ग्लोबल किंग ऑफ अॅग्री) आहे कारण तो शक्तिशाली अशा २३५ एनएम कमाल टॉर्क आणि २२०० किलोग्रॅमची प्रगत फाईव्हजी हायड्रॉलिक क्षमता देणाऱ्या ३सिलेंडर ३५३२ सीसी इंजिनाने सुसज्ज आहे. सोबतच, यात १२एफ प्लस ३आर कॉन्स्टंट मेश, साइड शिफ्ट ट्रान्समिशन आणि ग्लोबल पीटीओ यांच्यासह स्वतंत्र क्लच यांसारखे प्रीमियम तंत्रज्ञानही मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत वाढ होते.